ड्रायपोर्टच्या टायटल क्लीअर जमीनीसाठी राज्य सरकारचा विलंब का?

ड्रायपोर्टचा प्रकल्प केवळ निफाड तर जिल्ह्याच्या शेती व व्यापाराला चालना देणारा आहे.
Dr Bharti Pawar, Minister Of State, GOI
Dr Bharti Pawar, Minister Of State, GOISarkarnama
Published on
Updated on

ओझर : ड्रायपोर्टचा प्रकल्प केवळ निफाड तर जिल्ह्याच्या राज्याच्या शेती व व्यापाराला चालना देणारा आहे. (Dryport is important not for Niphad but Whole District & State) त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करते आहे. यासंदर्भात सर्व विषय राज्य सरकारकडे अडला आहे. राज्य शासनाने टायटल क्लिअर जमीन उपलब्ध करताच ड्रायपोर्टचा विषय मार्गी लावण्यासाठी मी कटीबद्ध आहे. मात्र राज्य सरकार त्याला का उशीर करते आहे, हे समजत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा भारती पवार (minister of state Dr Bharti Pawar) यांनी केले.

Dr Bharti Pawar, Minister Of State, GOI
एकनाथ खडसेंच्या कुटुंबात महाभारताचा पहिला अध्याय लवकर सुरु झाला!

भाजपतर्फे झालेल्या शेतकरी मेळाव्यात समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर बाणगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात शेतकरी मेळावा झाला. त्यानंतर मंत्री डॉ. पवार यांच्या उपस्थितीत विविध नागरी प्रश्न व समस्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या सुचना समजून घेतल्या. त्यावर मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी ओझर येथे १०० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावे, सिन्नर येथील कंपनीमधील राजकिय हस्तक्षेप थांबवून कामगारांना न्याय द्यावा, ओझर मुस्लिम समाजाच्या कब्रस्ताना साठी संरक्षक भिंत व केजिएन कॉलनी साठी विविध विकास कामे, ओझर उड्डाणपुलाला ओझरच्या नागरिकांसाठी सोयीच्या दृष्टीने कट देण्यात यावा, आदिवासी वस्तीतील विविध विकास कामे आणि निसाका ड्रायपोर्ट जमीन हस्तांतरण प्रश्न मिटवावा आदी मागण्या करण्यात आल्या.

Dr Bharti Pawar, Minister Of State, GOI
अजित पवारांच्या जादूच्या कांडीने बालेकिल्ल्यातच काँग्रेस धाराशायी!

मेळाव्याच्या सुरुवातीस यतीन कदम यांनी ओझर, सुकेणे व १० गावांसाठी महत्त्वाचे मरिमाता रस्त्याचे गेट एचएएलने कोरोनाच्या पाश्र्वभूमीचे बंद केल्याने दळणवळण ठप्प झाल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रांताधिकारी पठारे यांनी एचएएल प्रशासनाला नोटीस व काही कागदपत्रे दिली असून सोमवारपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी गेट खुले होणार आहे असे सांगितले. श्री. कदम यांच्यातर्फे मंत्र्यांसमोर विविध प्रश्न मांडण्यात आले.

जऊळके दिंडोरी गावातील डीआरडीओ हद्दीतील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न, द्राक्ष निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी व कंटेनर भाडेवाढ, पिंपळगाव महाविद्यालयासाठी ड्रॅगन बोटची मागणी, एचएएल कर्मचारी यांच्या बदली रद्द व्हाव्यात व कारखान्यास अधिकचे काम मिळावे, नाभिक व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळावी, कोकणगावसाठी सिंगल फेज योजना कार्यान्वित करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, माजी आमदार मंदाकिनी कदम, निफाड भाजपा विधानसभा प्रमुख यतीन कदम, बाणगंगा बँकेचे संचालक गनी कुरेशी, भाजप पदाधिकारी दिलीप मंडलिक, नितीन जाधव, किशोर कदम आदींसह येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com