मुंबई : महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) राज्यात युवकांना रोजगार (Employment) उपलब्ध व्हावा यासाठी वेदांत समुहाचा (Vedant Group) प्रकल्प राज्यात यावा यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र गुजरातच्या (Gujrat) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. हे राज्य सरकारचे (State Government) मोठे अपयश आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्याच्या जनतेची माफी मागतील का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. (Vedant Groups project supposed to be in Maharashtra was shifted to Gujrat)
या संदर्भात श्री. पाटील यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले होते, असे म्हटले आहे.
श्री. पाटील म्हणाले, वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे वीस अब्ज डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे.
महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.
गुजरातच्या निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसते. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच शिवेसनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, हा प्रोजेक्ट भारतात होत असल्याचे पाहून मला आनंद झाला. मात्र, त्याबरोबर मला धक्काही बसला. नव्या सरकारने ट्विट करून असा दावा केला होता की, हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणला जातो आहे. मग आता असे दिसतेय की हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून पाठवण्यासाठीच ते बांधील होते. आमच्या महाविकास आघाडी सरकारने हा प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात आणला होता, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
प्रोजेक्टच्या यशामुळे भारतासाठी नवी क्षितिज खुली होतील. उद्योग व कंपनी यशस्वी व्हावी यासाठी माझ्या सदिच्छा आहेत. औद्योगिक क्षेत्रात निरोगी स्पर्धा करत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र भारताच्या प्रगतीत अव्वल राज्य बनावे असाच महाविकास आघाडीचा उद्देश होता, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.