दीपक पांडेचे उपक्रम नाशिकमध्ये पुढे सुरु राहणार!

जयंत नाईकनवरे यांनी नाशिक शहर पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
Police commissioner Jayant Naiknavare, Nashik Latest News Updates
Police commissioner Jayant Naiknavare, Nashik Latest News UpdatesSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मी आत्ताच आलो आहे. नाशिक (Nashik) समजुन घेऊ द्या. नाशिककर चांगलेच आहेत असे गृहीत धरून चालतो. मावळते आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) हेच नव्हे तर पहिले आयुक्त के. के. कश्यप (K. K. Kashyap) यांपासून तर आजवरच्या सर्वच आयुक्तांचे जे जे चांगले उपक्रम असतील ते पुढे सुरु ठेवीन, असे शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांनी सांगितले. (Nashik Latest News Updates)

Police commissioner Jayant Naiknavare, Nashik Latest News Updates
गडकरी साहेब, टोल नाक्यांचा गुंता सोडवा, जनतेचे पैसे वाचवा!

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची मुंबईला बदली झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी नूतन पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांसमवेत संवाद साधला.

Police commissioner Jayant Naiknavare, Nashik Latest News Updates
राज ठाकरेंच्या घोषणेनं 'यूपी'तही हादरे; योगींचं ठाकरे सरकारच्या पावलावर पाऊल

ते म्हणाले, येथील पोलिस अकादमीत प्रशिक्षण घेत सेवेत सुरवात केली होती. आता याच नाशिकमध्ये पोलिस आयुक्त म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली, हे माझ्यासाठी नक्कीच अभिमानास्पद असल्याने आता कामकाजाचा आढावा घेऊन कामकाजास सुरवात करणार असल्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले.

आयुक्त नाईकनवरे म्हणाले, की माझे पोलिस प्रशिक्षण हे नाशिकलाच झाले असल्याने मला शहराची चांगली माहिती होती. आता भरपूर बदल झाला असला तरी नाशिक माझ्यासाठी नवीन नाही. येथील कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी जे उपक्रम माजी पोलिस आयुक्त यांनी राबविले होते. तेच पुढे चालू राहतील. यात जर बदल करण्याचे असल्यास तेही होतील. तसेच जनसामान्यांचे हित जोपासत कामकाज केले जाईल. यासाठी सर्वप्रथम अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर ग्राउंड रिअलिटीचा संपूर्ण अभ्यास करूनच काम केले जाईल, असा विश्‍वास आयुक्त नाईकनवरे यांनी दिला.

यावेळी पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौघुले-श्रींगी, विजय खरात, संजय बारकुंड यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी नवनियुक्त पोलिस आयुक्तांचे स्वागत केले.

दीपक पांडेंशी चर्चा करणार

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची रजा असल्याने त्यांच्यासोबत आज भेट झाली नाही. मात्र त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत अधिक माहिती घेतली जाईल. माजी आयुक्तांनी नागरी हितासाठी जे काही चांगले निर्णय आणि योजना शहरात राबविल्या असतील त्या नक्कीच कायम राहतील.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com