भाजपच्या नेत्यांनी किती टक्केवारी घेतली ते जाहीर करेन!

आमदार फारूक शाह यांच्या ३० कोटींप्रश्‍नी भाजपच्या नेत्यांवर थेट आरोप केला.
Faruk Shah
Faruk ShahSarkarnama

धुळे : महापालिकेच्या (Dhule) स्थायी समिती सभेत गुरुवारी (ता. २४) सत्ताधारी भाजपचे (Ruling BJP) नगरसेवक नागसेन बोरसे (Corporator Nagsen Borase) यांनी ३० कोटींच्या निधीबाबत आमदार फारूक शाह (MLA Faruk Shah) यांच्यावर टक्केवारीसंदर्भात आरोप केला. त्याचा अतीशय कठोर शब्दात समाचार घेत `एमआयएम`चे (AIMIM) आमदार फारूक शाह यांनी समाचार घेतला. भाजपच्या नेत्यांनी किती टक्केवारी घेतली ते जाहीर करून असा इशारा त्यांनी दिला. (AIMIM MLA given challange to Ruling BJP leaders on Commission)

Faruk Shah
भाजपचे आमदार ढिकले अन् शिंदे गटाचे खासदार गोडसे आमने सामने!

यानंतर आमदार शाह यांनी भुयारी गटार योजना, अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना, गॅस पाइपलाइन योजना आदींमध्ये भाजपच्या धुळे शहरातील कोणी कोणी टक्केवारी घेतली याचा जाहीर सभेत पर्दाफाश करणार असल्याचे प्रतिक्रियेद्वारे प्रसारमाध्यमांना सांगितले.

Faruk Shah
नाशिकच्या रस्त्यांची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा!

आमदार शाह म्हणाले, की महापालिकेचे प्रवेशद्वार उघडले आणि बंद होईपर्यंत भाजपचे सदस्य बोरसे महापालिकेत ठिय्या मांडून असतात. ते तक्रारी भरपूर करतात, अनेक प्रकरणे उजेडात आणल्याचा आव आणतात. नंतर पडद्याआडून टक्केवारी घेऊन गप्प बसतात. त्यांचा तो व्यवसाय असल्याचा आरोप आहे.

तीस कोटींबाबत खरा प्रश्‍न

तीस कोटींच्या निधीबाबत आमदार शाह यांनी सांगितले, की दहा महिन्यांपूर्वी तत्कालीन नगरविकासमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धुळे शहरातील नादुरुस्त रस्त्यांसाठी निधी मागितला. त्यांनी प्रस्ताव सादर करण्याची सूचना प्रधान सचिवांना, त्यांनी मनपा आयुक्त देवीदास टेकाळे यांना ही सूचना दिली. मुख्यमंत्र्यांना ३० कोटींच्या निधी मागणीचे पत्र देताना कामांची यादी जोडली होती. कामांमध्ये हिंदू-मुस्लिम भागाचा समावेश होता. मी दिलेली कामांची यादी महापालिकेच्या महासभेत भाजपच्या महापौरांसह ५१ नगरसेवकांनीही मंजूर करत ठराव पारित केला. तेव्हा सत्ताधारी नगरसेवक झोपले होते का? या विषयापासून खासदार डॉ. सुभाष भामरे अनभिज्ञ होते का?

खासदारांकडून तर धमकी

दहा महिने परिश्रम घेतल्यानंतर ३० कोटींच्या निधीबाबत मी कामांची यादी सादर केली होती. त्यानुसार मनपाच्या ठरावामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी शब्द पाळत हा निधी दिला. आमदारांनी निधी आणला, मात्र खासदार आणू शकले नाहीत, अशी धुळेकरांची धारणा झाल्याने डॉ. भामरे अस्वस्थ झाले. त्यांनीच मुख्यमंत्री शिंदेंची, नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिशाभूल केली, इतकेच नव्हे तर आमदारांना दिलेल्या ३० कोटींच्या निधीबाबत स्थगिती दिली नाही, तर खासदारकीचा राजीनामा देईन, अशी धमकी डॉ. भामरे यांनी या प्रमुख मंत्र्यांना दिली. त्यात आमदार शाह लोकप्रिय होत असल्याने त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे.

भामरेंकडून आमदारांची नक्कल

आमदार शाह यांची जो बदनामी करेल, त्याला पक्षात, महापालिकेत पद दिले जाईल, अशी स्पर्धा खासदारांसह भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी नगरसेवकांमध्ये लावल्याचे दिसते आहे. यात खासदार डॉ. भामरे तर माझी नक्कल करू लागले आहेत. नऊ वर्षांत त्यांनी केंद्राकडून धुळे शहरासाठी किती निधी आणला, काय भरीव व ठोस काम केले? आमदार म्हणून मी कोरोनाकाळात सिव्हिलला ऑक्सिजन प्लांट दिला, नंतर खासदार भामरे यांनी हिरे मेडिकलला हा प्लांट जाहीर केला, मी दिव्यांगांसाठी भवन होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला, ते दिव्यांगांना नऊ वर्षांनंतर सायकलवाटप करत आहेत, अशी अनेक उदाहरणे आमदार म्हणून सांगू शकतो. आमदार शाह यांना शासनाने निधी देऊ नये म्हणून भाजपचे स्थानिक प्रमुख लोक तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com