Sushma andhare : सुषमा अंधारेंचं आव्हान देवेंद्र फडणवीस स्वीकारणार का?

Sushma andhare News : 'मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांना चर्चेला बसवा, आम्ही चर्चेला तयार..'
Devendra Fadnavis and
Devendra Fadnavis and Sarkarnama

Sushma andhare News : ''वारकरी संप्रदायाच्या मुद्द्यावर मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेला बसायला तयार आहे. पण देवेंद्र फडणवीस हे यावर चर्चा करायला तयार आहेत का? जर त्यांना वेळ नसेल तर मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांना चर्चेला बसवा, आम्ही चर्चा करायला तयार आहोत, असं आव्हान सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे या आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे फडणवीस आता त्यांचं आव्हान स्वीकारणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सुषमा अंधारे यांनी देव-देवतांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा पाडा वाचला. त्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी त्यांना उत्तर देत थेट समोरा-समोर चर्चा करण्याचं आव्हान दिलं आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ''शंभुराज देसाई म्हणतात इतरांना कावीळ आहे. मग शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिली. त्यामुळे त्यामध्ये गोपनियतेचा भंग झालेला आहे. यावर देवेंद्र फडणवीस काही बोलणार आहेत का?'', असा सवाल त्यांनी केला.

Devendra Fadnavis and
Eknath Shinde : सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना दरमहा २० हजारांची मुख्यमंत्र्यांची घोषणा

''शाई फेकली तर 307 कलम लावले जाते. आज महाडमध्ये गोगावलेंच्या विरोधात कोणीतरी व्हॉट्सअ‍ॅपवर अपशब्द वापले तर त्यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल झाला. याबाबत टीव्हीला देखील बातमी आहे. गोगावले यांच्याबाबत अपशब्द वापले तर गुन्हा दाखल करता. मग सुषमा अंधारेंला रोज धमक्या दिल्या जातात. रोज सोशल मीडियावर बदनामी कारक बोललं जातं. याबाबत आपण का बोलत नाहीत? देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. त्यांनी यावरही बेलावं'', असं त्या म्हणाल्या.

''13 वर्षा पासून माझ्या वक्तव्याबाबत का कारवाई केली नाही. मग आत्ताच का? वारकरी संप्रदायाचे कोणीही आक्षेपार्ह बोलत नाही. फक्त मोहन भागवत संप्रदायाचे लोकं बोलतात. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेला बसायला तयार आहे. फडणवीसांनी या विषयावर चर्चेला बसावं. जर आपल्याला वेळ नसेल तर आपल्या मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्री महोदयांना चर्चेला बसवा आम्ही चर्चा करायला तयार आहोत'' असं आव्हान त्यांनी दिलं.

Devendra Fadnavis and
Pawar-Fadnavis : सरकार पाडण्याच्या फडणवीसांच्या ‘त्या’ खेळीची अजित पवारांनी केली पोलखोल

''नरेश आग्रवाल हे भाजपचे आमदार आहेत. ते देव-देवतांबाबत बोलले मग तो आपमान नाही का? पण मुद्दा असा आहे वाट्टेल त्याच्यावर गुन्हा दाखल कसा करता? भाजपच्या मानसाला बोललं तर 307 आणि बाकीच्यांना बोललं तर काहीच कारवाई नाही. ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांचं काय? एकनाथ खडसे यांना वेगळा न्याय आणि एकनाथ शिंदे यांना वेगळा न्याय असं का? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही गृहमंत्री हे महाराष्ट्राचे आहात भाजपचे नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना समोरा-समोर चर्चा करण्याचे आव्हान केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com