दादा भुसेंच्या व्यासपीठावर भाजपचे सुभाष भामरे शिवसेनेला डिवचतील का?

मालेगाव शहरात आज तीन रुग्णालयांचे भुमिपूजन होत आहे.
Dada Bhuse & Dr Subhash Bhamre
Dada Bhuse & Dr Subhash BhamreSarkarnama
Published on
Updated on

मालेगाव : राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे (Shivsena minister Dada Bhuse) यांचा विधानसभा मतदारसंघ माजी केंद्रीय राज्यमंत्री डॅा सुभाष भामरे (BJP`s Ex Minister Dr Subhash Bhamre) यांच्या लोकसभा मतदारसंघात मोडतो. हे दोन्ही नेते आज एका व्यासपीठावर येत आहेत. विकासाचा प्रश्न असो वा भाजपचे राजकारण यामध्ये डॅा भामरे सातत्याने राज्य सरकारला लक्ष्य करीत असतात. आज ते भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेनेला डिवचतील काय? याची उत्सुकता आहे.

Dada Bhuse & Dr Subhash Bhamre
भाजपच्या शक्तिप्रदर्शनाने शिवसेना का झाली अस्वस्थ?

शहरातील मोसमपुल-संगमेश्‍वर, कॅम्प व द्याने-रमजानपुरा या तीन वेगवेगळ्या विभागात ४२ कोटी रुपये खर्चून तीन नवीन सुसज्ज रुग्णालय साकारत आहेत. आज या रुग्णालयांचे भुमिपूजन व त्यानिमित्त सायंकाळी सहाला पोलिस परेड मैदानावर कोरोनाकाळात विविध चाळीसपेक्षा अधिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या विविध घटकांचा शहरवासिय व सर्व पक्षीयांतर्फे कोरोना योद्धा सन्मान सोहळा होणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.

Dada Bhuse & Dr Subhash Bhamre
`त्या` निर्णयाने एकनाथ खडसेंचे नेतृत्व आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व दोन्ही सिद्ध झाले!

या सोहळ्यास खासदार सुभाष भामरे, आमदार सुहास कांदे, आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर आदी प्रमुख पाहुणे असतील. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, चालक, वाहक, अंत्यविधी करणाऱ्या, रूग्णवाहिकेची सेवा देणारे, ऑक्सिजन पुरवठा करणारे, अंगणवाडी, आशासेविका आदींसह विविध क्षेत्रातील दोन हजार कोरोना योद्ध्यांचा या वेळी सन्मान करण्यात येईल. त्यासाठी भव्य सभामंडप उभारण्याचे काम सुरु आहे. या सोहळ्यास शहर व तालुकावासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सन्मान सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे.

आरोग्यात शहर होणार सक्षम...

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मोसम पुलावरील महिला व बाल रुग्णालयाच्या जागेत ३३ कोटी ७७ लाख रुपये खर्चून १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय, द्याने-रमजानुरा भागात चार कोटी १५ लाख रुपये खर्चून प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत १५ खाटांचे रुग्णालय होईल. यात केंद्राचा हिस्सा २ कोटी ४९ लाख तर राज्याचा हिस्सा १ कोटी ६६ लाख रुपये आहे. कॅम्प भागात अमेरिकन इंडिया फाऊंडेशन ट्रस्टच्या सीएसआर निधीतून साडेचार कोटी रुपये खर्चून रावळगाव नाका येथे मॉड्युलर हॉस्पीटल होईल. या रुग्णालयांमुळे आरोग्य सुविधांच्या बाबतीत शहर सक्षम होणार आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com