Amit Thakrey: युवकांना नोकरभरतीसाठी मार्गदर्शन करू !

येवला येथील विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये फुटबॉल टर्फच्या उद्‌घाटन प्रसंगी अमित ठाकरे यांनी फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला.
Amit Thakrey playing Football
Amit Thakrey playing FootballSarkarnama
Published on
Updated on

येवला : आज विद्यार्थ्यांसमोर (Students) अनेक अडचणी असून, त्या सोडविण्यासाठी मनसे (MNS) विद्यार्थी सेना पुढाकार घेणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, नोकर भरती मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत. विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाप्रमुख अमित ठाकरे (Amit Thakrey) यांनी केले. (Amit Thakrey meet students in Yeola)

Amit Thakrey playing Football
Supreme court: ...तर आमदार अपात्र ठरवले जातील!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी महासंपर्क अभियानांतर्गत येवल्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यार्थी सेनेत प्रवेश केला. सुरवातीला अमित ठाकरे यांचे येवल्यातील विंचूर चौफुलीवर ढोल- ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Amit Thakrey playing Football
Congress: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान किती?

त्यांचा पहिलाच दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. यानंतर विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश पटेल व डॉ. संगीता पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये अमित ठाकरे यांच्या हस्ते फुटबॉल टर्फचे उद्‌घाटन झाले. या वेळी त्यांनी फुटबॉल खेळण्याचाही आनंद लुटला. विशेष म्हणजे गोल झाल्यानंतरच त्यांनी फुटबॉलला किक मारण्याचे थांबविले.

विद्यालयात जमलेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. मनसे विद्यार्थी सेनेत काम करायला आवडेल का, असा सवाल करून विद्यार्थ्यांच्या शाळेचे शुल्क, प्रवेश, बस, मुलींची छेडछाड याप्रश्नी आपल्याला काम करायचे असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थी सेना तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष संघटन वाढविण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, शहराध्यक्ष गौरव कांबळे, जिल्हा सरचिटणीस रामदास लासुरे, शहर संघटक शैलेश करपे, तालुकाध्यक्ष नकुल घागरे, विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महेश लासुरे, चेतन फुलारी, माणिक पवार, प्रवीण खैरनार, महेश भातकुटे, अक्षय पंढोरे, सदाशिव चव्हाण, सागर खोडके आदींसह विद्यार्थी व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. तसेच, विद्यार्थी व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीप्रसंगी पत्रकारांना दूर ठेवले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com