`पदवीधर` निवडणुकीत विखे- थोरातांची पारंपारीक लढत?

महसूल मंत्री डॅा. विखे पाटील गटाकडून पदविधर मतदारसंघात चाचपणीने चुरस
Dr Sudhir Tambe, Dr Rajendra Vikhe Patil & Hemant Dhatrak
Dr Sudhir Tambe, Dr Rajendra Vikhe Patil & Hemant DhatrakSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : पदविधर मतदारसंघाच्या (Nashik Graduate constituency) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. विद्यमान आमदार डॅा सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना काँग्रेसची (Congress) उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांची लढत भाजपशी (BJP) असेल त्यासाठी यंदा थोरातांचे पारंपारीक विरोधक विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe patil) गटाशी त्यांची लढत होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ही लढत तुल्यबळ ठरण्याबरोबरच रंगतदार होईल. (BJP & Comgress both will utilise there maximum political power in this election)

Dr Sudhir Tambe, Dr Rajendra Vikhe Patil & Hemant Dhatrak
Marathwada : ठाकरेंच्या दौऱ्याने शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल का ? शिवसैनिक मात्र सुखावले..

नियमाप्रमाणे विधानसभेआधी राज्यातील विधान परिषदेच्या पदवाधर मतदारसंघाच्या निवडणुका होत असतात. नाशिक विभाग अर्थात उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पदविधर मतदारसंघात काँग्रेसचे डॅा. सुधार तांबे सलग दोन टर्म निवडून आले आहे. यंदा ते हॅट्रीकच्या तयारीने मैदानात उतरले आहेत. पुरोगामी विचारांची शिक्षकांची संघटना असलेल्या टीडीएफ यांनी त्यांना पाठींबा जाहीर केला. त्यामुळे ते उत्साहात आहेत.

Dr Sudhir Tambe, Dr Rajendra Vikhe Patil & Hemant Dhatrak
शेतकऱ्यांच्या बांधावरुन ठाकरेंनी राज्य-सरकारवर ओढला आसुड...

डॅा. तांबे म्हणजे माजी मंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असे समिकरण आहे. अर्थातच त्यामुळे थोरातांचे विरोधक बाह्या सरसावण्याची संधी सोडणार नाही. तसे घडले देखील. भाजपतर्फे राज्याचे महसूल मंत्री डॅा विखे पाटील यांचा गट सक्रीय झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या गटाचा उमेदवार कोण हे अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु त्यांनी चाचपणी सुरु केली आहे. विखे पाटील यांची एक राजकीय प्रतिष्ठा आहे. त्यातही नगर जिल्ह्याच्या पारंपारीक राजकारणत विखे आणि थोरात यांच्या समर्थक परस्परांना भिडण्याची कोणतिही संधी सोडत नाहीत. अशा स्थितीत भाजपला एक प्रबळ उमेदवार मिळेल. मतदारांना एक प्रखर राजकीय संघर्ष पहायला मिळेल, अशी स्थिती आहे.

भाजपतर्फे राजेंद्र विखे पाटील?

`पदविधर`साठी न्यायालयाच्या निर्देशानुसार नवी मतदारयादी करावी लागणार आहे. त्यात अर्थातच डॅा. तांबे आघाडीवर आहेत. अर्थात भाजपकडून उमेदवारासाठी विविध इच्छुक आहेत. त्यांचीही तयारी सुरु आहे. सद्यस्थितीत विखे पाटील यांचे लहान बंधु राजेंद्र विखे पाटील, नाशिकहून हेमंत धात्रक, धुळे येथून धनराज विसपुते हे इच्छुक आहेत. यामध्ये विखे पाटील यांच्यामागे प्रवरा एज्युकेशन ट्रस्ट, हेमंत धात्रक यांना व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे पाठबळ आहे. त्यामुळे ऑर्गनाईज पद्धतीने हे उमेदवार व्यक्तीशः कार्यरत होतील. त्यांना भाजपच्या नंदुरबार, धुळे, जळगाव व नाशिक येथे भाजपची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका, जिल्हा परिषद सदस्यांचे पाठबळ मिळेल. त्यामुळे निवडणूक रंजक होईल.

गत निवडणुकीत डॅा. प्रशांत पाटील हे भाजपचे उमेदवार होते. त्यांनी काँग्रेसला चांगली लढत दिली होती. तेव्हा सुमारे १.९५ लाख मतदार होते. यंदा उमेदवारांची तयारी पाहता मतदारसंख्या तीन लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. व्यक्तीगत संपर्क, संघटनात्मक बांधणी आणि गेले सहा वर्षे रोजच निवडणूकीची जाणीव ठेऊन केलेली कामे याचा विचार करता सध्या तरी स्पर्धेसाठी पक्षानेच उमेदवारी जाहीर केल्याने डॅा. तांबे काहीसे पुढे आहेत. ही आघाडी ते कसे टिकवता की मागे पडतात हे भाजपने उमेदवार जाहीर केल्यावर स्पष्ट होईल.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com