धनंजय सोनवणे
साक्री : येथील (Dhule) बंद पांझरा कान सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) भाडेपट्ट्याने सुरू करण्यासंदर्भात घडामोडी सुरू आहेत. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पावरफुल आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची भेट घेऊन त्यांना विनंती करण्यात येणार आहे. ते खरंच पांझरा कान कारखान्यात इंटरेस्ट घेतील का आणि यानिमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात पवार एंट्री करतील का, अशी चर्चा सुरू झाली आहे. (People will meet Rohit Pawar For Panjharakan Sugar Factory issue)
साक्री तालुक्यातील बंद पांझरा कान सहकारी सहकारी कारखाना पुनरुज्जीवित करण्याचा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अनेकवेळा नेण्यात आला. आता आमदार रोहित पवार यांनाच यासाठी पुढाकार घेण्यासाठी त्यांची भेट घेण्याची मागणी होऊ लागली आहे. (MLA Rohit Pawar News)
आमदार रोहित पवार यांचा साखर कारखानदारीतील दांडगा अनुभव लक्षात घेता पांझरा कान सहकारी कारखान्याला पुनरुज्जीवन मिळवून देण्यासाठी तेच सक्षम पर्याय ठरू शकतील, अशी भावना अनेक मान्यवरांनी मेळाव्यात व्यक्त केली.
पांझराकान सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी खरोखरच सहभाग घेतला आणि तो सुरू केला, तर कारखान्याच्या माध्यमातून तालुका व पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणात पवार नावाची एंट्री होऊ शकेल. सर्वच क्षेत्रात पॉवरफुल असणाऱ्या पवार कुटुंबियांच्या एन्ट्रीने तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासालाही हातभार लागू शकणार आहे. यामुळे या सर्व घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.