Ahmednagar News : पाचशे वर्षांच्या परंपरेला तडा जाणार? अहमदनगर ते अहिल्यानगर; नामांतरानंतरही दोन स्थापना दिवस...

New Establishment Date With Ahilyanagar Namantara : 'विचार भारती संस्थे'ने नगर शहराचे नाव आता अहिल्यानगर झाल्याचे सांगत यापुढे दरवर्षी 31 मे रोजी 'अहिल्यानगर स्थापना दिन' साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. यानुसार शोभायात्रा आणि कलावंतांचा कलाविष्कार रंगणार आहे.
Ahmednagar News
Ahmednagar Newssarkarnama

Nagar News : अहमदनगर शहराच्या नामांतराचा ठराव राज्य सरकारने मंजूर करत केंद्राकडे पाठवले आहे. त्यावर कधी शिक्कामोर्तब होईल माहीत नाही. परंतु नगरमधील हिंदुत्ववादी संघटनांनी नगरचे नाव अहिल्यानगर केले आहे. या नामांतरानंतर आता शहराचा स्थापना दिन देखील बदलला आहे. यापुढे दरवर्षी 31 मे रोजी अहिल्यानगर शहर स्थापना दिन साजरा होणार आहे.

अहमद निजामशहाने 28 मे 1490 मध्ये अहमदनगर शहराची स्थापना केली. यानुसार आज 28 मे रोजी अहमदनगर शहराचा 534 वा स्थापना दिन आहे. परंतु राष्ट्रहितासाठी जपण्यासाठी समविचारींनी निर्माण केलेली 'विचार भारती संस्थे'ने अहमदनगर शहराचे (Ahmednagar) नाव आता अहिल्यानगर झाल्याचे सांगत, यापुढे दरवर्षी 31 मे रोजी अहिल्यानगर स्थापना दिन साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. यानुसार नगर शहराचा पहिला स्थापना दिनानिमित्ताने 31 मे रोजी सकाळी शोभायात्रा आणि सायंकाळी स्थानिक कलावंतांचा कलाविष्कार रंगणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ahmednagar News
MLA Ram Shinde News : 'नगर दक्षिणमधून विजय कोणाचा होणार? मताधिक्य घटणार'; आमदार शिंदे स्पष्ट बोलले...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) आहे. त्यांचे कार्य उत्तर भारतात प्रसिद्ध असले तरी, देशात आदर्शवत कार्य घडवणार्‍या जिल्ह्याच्या या कन्येचा उचित गौरव व्हावा, या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर', असे करण्याची मागणी झाली होती. या मागणीला राज्यातील भाजप (BJP) महायुती सरकारने मान्यता देताना मागील वर्षी चौंडी येथे 31 मे रोजी झालेल्या अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नगरचे नाव 'अहिल्यानगर' घोषित केले. New establishment date with renaming of Ahmednagar city to Ahilyanagar

नगर महापालिकेने तसा ठराव करत राज्य सरकारकडे पाठवला. सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराचा ठराव मंजूर केला. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर केंद्र सरकारकडून या नामकरणावर (Ahmednagar To Be Renamed) अंतिम शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, यंदापासून नगरमध्ये अहिल्यादेवी होळकर गौरव दिन साजरा केला जाणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच विचारभारती संस्थेच्या माध्यमातून याअंतर्गत येत्या 31 मे रोजी सकाळी नगर शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. सायंकाळी सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. यात स्थानिक कलावंतांना कलाविष्काराची संधी दिली जाणार आहे.

नगरला दोन नावं, दोन तारखा...

अहमदनगर शहराच्या नामांतराबरोबरच नवीन स्थापन दिन विचार भारतीने जाहीर केल्याने शहर स्थापनेच्या मुद्यावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अहमदनगर शहराच्या नामांतराला काही सामाजिक संस्थांनी आणि मुस्लिम संघटनांनी जाहीर विरोध केला आहे. यातच नवीन तारीखेनुसार स्थापना दिन साजरा केला जाणार असल्याने पाचशे वर्षांच्या परंपरेला तडा जाणार असल्याने इतिहासप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच एकाच शहराच दोन नाव आणि दोन स्थापना दिवस म्हटल्यावर काहींनी हे नगरमध्येच होऊ शकते, असे म्हटले आहे.

Ahmednagar News
Nashik Income Tax Raid: शोभेच्या फर्निचरमध्ये सापडल्या तब्बल 26 कोटींच्या नोटा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com