Mohadi Sarpanch News: राजकारणात खुर्ची सोडण्याची कोणाचीही तयारी नसते. काहीही करून आपण खुर्चीवर कायम कसे राहू याचे प्रयत्न राजकीय व्यक्तींकडून केल्याचे पाहण्यास मिळते. आपले सरपंचपद जाऊ नये म्हणून महिलेने थेट पतीपासून आपण विभक्त असल्याची कागदपत्रेच सादर केली. मात्र, तरी देखील तिचे सरपंचपद वाचू शकले नाही.
मतदारांमधून थेट सरपंच झालेल्या महिलेला गावकीचे राजकारण आडवे आले. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने विरोधकांनी डाव साधला. त्यामुळे महिला सरपंच अपात्र ठरल्या आहे.
नाशिक जिल्ह्यातील मोहाडी (दिंडोरी) येथील जनतेतून थेट सरपंच झालेल्या अशा लहामगे यांना स्थानिक राजकारण चांगलेच महागात पडले आहे. विरोधकांनी केलेल्या राजकीय खेळीने येथील महिलेला सरपंचपदावर पाणी सोडावे लागले आहे.
शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार सरपंच अशा लहानगे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती. या संदर्भात झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच लहानगे यांना अभय दिले होते. मात्र इरेला पेटलेल्या विरोधकांनी त्या विरोधात आयुक्तांकडे धाव घेतली होती.
मोहाडी येथील आशा लक्ष्मण लहांगे या जनतेतून थेट सरपंच झाल्या होत्या. त्यांचे विरोधक सविता भाऊसाहेब पवार आणि किरण पंढरीनाथ नाईक यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. घरालगतच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याची तक्रार त्यांनी केली होती.
विरोधकांनी तक्रार केल्यावर सरपंच लहांगे यांनी संबंधित बांधकाम आणि घर आपले नसल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी पती पासून विभक्त झाल्याचा पुरावा सादर केला.
गावातील नेते प्रवीण जाधव यांच्या इमारतीत आपण विभक्त राहत असल्याचा त्यांचा दावा होता. विरोधकांनी मात्र तो मोडीत काढत त्यांच्यावर मात केली आहे. गावातील नावाजलेल्या राजकीय नेत्यावर या निमित्ताने विरोधकांनी कुरघोडी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंच लहानगे यांना अभय मिळाले होते. मात्र विरोधकांनी या निकाला विरोधात थेट आयुक्तांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाला महसुलायुक्तांकडे आव्हान देण्यात आले होते. आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीत विरोधकांनी खिंड लढवली. त्यामुळे शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे उघड झाले. परिणामी आयुक्तांनी लहानगे यांचे सरपंच पद रद्द केले आहे.
सिटी सर्वे क्रमांक 431 येथील घराचे अतिरिक्त बांधकाम आणि ओटा अतिक्रमित होता. सरपंच लहांगे यांच्या या बांधकामाबाबत भूमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी निर्देश देण्यात आले होते. भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष जागेच्या मोजणीत सरपंचांनी अतिक्रमण केल्याचे उघड झाले. मोहाडी हे गाव दिंडोरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागरूक मानले जाते. त्यामुळे स्थानिक गावठीच्या राजकारणात नेते सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात. सरपंच लहानगे या प्रवीण एकनाथ जाधव गटाच्या मानल्या जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.