Nashik Womens Crime News: पुणे शहरातील विवाहितेच्या छळानंतर महिला अत्याचाराच्या घटना चर्चेत आल्या होत्या. आता नाशिक शहरात पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली आहे. त्याच दिवशी चार विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याच्या घटना पुढे आले आहेत.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसात विद्यार्थिनी आणि महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या संदर्भात सोमवारी एकच दिवशी चार घटनांची पोलिसात नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये एका दहा वर्षीय बालिकेचाही समावेश असल्याने शहर हादरले.
शहरातील चुंचाळे भागात एका दहा वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून युवकाने अश्लील वर्तन केले. मुलीने घरी आल्यावर हा प्रकार सांगितल्याने तिच्या आईने याबाबत पोलिसांत तक्रार केली. या संदर्भात पोलिसांनी राजेश पुंडलिक पवार (वय ३०) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याच भागात दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीला हरिश्चंद्र लालमुनी कुंभार (वय ३०) याने विविध आमिषे दाखवून तसेच धमकावून जुलै २०२४ ते ऑगस्ट २५ या दरम्यान तिच्यावर अत्याचार केले. यामुळे संबंधित अल्पवयीन मुलीने गर्भवती होऊन तीने बाळाला जन्म दिला. यासंदर्भात मुलीच्या आईने पोलिसात तक्रार केल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणात पोक्सो अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक रोड भागातील एका १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तिच्यासोबत युवकाने तीचा छळ केला. तिच्याशी एकतर्फी प्रेमातून धमकावत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिचे वादग्रस्त फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे या मानसिक छळाला कंटाळून संबंधित युवतीने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
संबंधित प्रकरणात संशयित गणेश भांगरे (वय २०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश हा गेले अनेक दिवस एकतर्फी प्रेमातून संबंधित १७ वर्षे युवतीचा छळ करत होता. त्याचा मित्र अक्षय वरठे याने वादग्रस्त फोटो मॉर्फ करून समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात मदत केली. पोलिसांनी या दोघांवरही कारवाई केली आहे.
शहरातील सारडा सर्कल भागातही एक विद्यार्थिनी शाळेतून क्लासला जात असताना तिचा वाहनातून पाठलाग झाला. अल्पवयीन विद्यार्थीनीला जबरदस्ती कारमध्ये बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न होता. या युवतीने तेथून पलायन करीत एका ठिकाणी लपून ती बसली. त्यामुळे ती वाचली. काही नागरिकांनी त्यात हस्तक्षेप केल्याने संशयित वाहनासह पळून गेला.
या चारही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधितांना ताब्यात घेतले आहे. मात्र एकाच दिवशी चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. या घटनांनी नाशिक शहरातील पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. याबाबत पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.