Ajit Pawar News : अजितदादा म्हणाले, गायकरांकडे माझे विशेष लक्ष; विधान परिषदेचा मार्ग मोकळा ?

Sitaram Gaikar News : अजितदादांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत सकारात्मक आश्वासन दिले.
Ajit Pawar, Sitaram Gaikar News
Ajit Pawar, Sitaram Gaikar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : विधान परिषदेच्या बारा जागांचे घोंगडे भिजत पडलेले आहे. इच्छुकांना मात्र घोंगडे सुकेल तेंव्हा सुकेल पण आपला नंबर बारा मधे 'फिक्स' व्हावा ही अभिलाषा आहेच. गप्प बसलो तर ऐनवेळी आपला नंबर हुकायला नको असेही काहींना वाटतेय. अकोल्यातील जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष जेष्ठनेते सीताराम गायकर (Sitaram Gaikar) यांचे कार्यकर्तेही असाच काहीसा हट्ट थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करत आहेत. या निमित्ताने गुरुवारी सकाळीच भेट घेण्यासाठी गायकरांच्या समर्थकांनी मुंबई गाठत अजितदादांना गाठले.

गायकरांच्या समर्थनार्थ गेलेले जिल्हा परिषदेच्या (Legislative Council) बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे, बाळासाहेब भोर, अशोक देशमुख, संभाजी पोखरकर आदींनी गायकर यांची विधान परिषदेवर वर्णी लावावी अशी गळ घातली. अजितदादांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत सकारात्मक आश्वासन दिले.

Ajit Pawar, Sitaram Gaikar News
Jitendra Awhad News : 'त्या' बॅनरवर 'पळकुट्यांनो नाव लिहायचे ना' ; जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

अजितदादांनी अकोले तालुक्यावर आपले पूर्वीपासूनच प्रेम असून माझे गायकरांवर विशेष लक्ष आहे, असे सूचक आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. अकोले विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती साठी राखीव आहे. अशात यापूर्वी विधानसभा आणि परिषदेसाठी, असे दोन लोकप्रतिनिधी तालुक्यात असताना येथील आदिवासी भागाचा वेगाने विकास झाल्याची जुनी उदाहरणे सध्या चर्चेत आणली जात आहेत.

Ajit Pawar, Sitaram Gaikar News
Ahmednagar Politics : शिर्डीची जागा सुटणार कुणाला ? भाऊसाहेब वाकचौरे पेचात !

विधान परिषदेच्या बारा जागा ह्या सध्या न्यायालयीन निर्णय आणि त्यानंतर राज्यपाल यांच्या मंजुरीच्या अधीन आहेत. त्यात अनुकूल निर्णय आल्यास त्यात भाजपच्या (BJP) वाट्याला निम्या 6 तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार गटाला 3-3 जागांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. अशात महायुतीतील तीनही पक्षांसाठी 'एक अनार और सौ बीमार' अशी वस्तुस्थिती असताना पक्ष नेतृत्व कुणाची वर्णी लावणार ही मोठी कसरत असणार आहे. मात्र 'उम्मीद पर दुनिया कायम है' याला राजकारणी कसे अपवाद असणार हे नाकारता येणार नाही.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com