Chhagan Bhujbal Politics : नाराजीची चर्चा सुरू असतानाच भुजबळ लागले कामाला; फडणवीसांना लिहिले पत्र

Maharashtra CM Devendra Fadnavis Nashik Politics : छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.  
Chhagan Bhujbal  devendra fadnavis
Chhagan Bhujbal devendra fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : छगन भुजबळ यांना यंदा मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे भुजबळ यांना सामान्य आमदाराप्रमाणेच आपल्या मतदारसंघाची काळजी वाटू लागली आहे. परिणामी, आता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित निधीची मागणी केली आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदार संघातील विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी एक निवेदन देखील दिले आहे. या निवेदनात येवला मतदार संघातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.

Chhagan Bhujbal  devendra fadnavis
Chhagan Bhujbal : भुजबळांची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले, मविआ सरकारच्या काळातील 'ही' योजना यापुढेही सुरुच ठेवा...

माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मतदार संघातील येवला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना, शिवसृष्टी योजनेतील प्रलंबित कामे, लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपसमिती आभारासाठी जागा मंजूर करणे तसेच येवला आणि लासलगाव पोलीस ठाण्यात करिता अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचे बांधकाम आदी विषयांचा या पत्रात उल्लेख आहे.

माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अद्यापही येवला शहरात पाच ते सात दिवसांच्या खंडानंतर पाणी येते. त्यामुळे या शहरासाठी मंजूर पाणीपुरवठा योजनेला गती देण्याची आवश्यकता आहे. मतदारसंघात शिवसृष्टीचे काम सध्या सुरू आहे. ते काम निधी उपलब्ध न झाल्यास बंद पडू शकते. त्याबरोबरच अन्य विविध विकास प्रकल्प पूर्ण करण्याची गरज आहे. त्याकडे भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

Chhagan Bhujbal  devendra fadnavis
Dr Shobha Bacchav Politics: मतदान केले नाही म्हणून भाजप मालेगावला शत्रू समजते काय?

भुजबळ गेली वीस वर्ष येवला मतदारसंघाचे प्रतिनिधी करत आले आहे. या कालावधीत ते मंत्रिमंडळात राहिले आहेत. अनेक वर्ष ते जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. त्यामुळे येवल्यासाठी हवा तेवढा निधी वर्ग करण्यात अडचणी येत नव्हत्या. सध्या मात्र ते मंत्रिमंडळात नाहीत, पालकमंत्री अद्याप नियुक्त झालेले नाहीत. त्यामुळे एकीकडे भुजबळ यांच्याकडे मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मागितला जात होता.

सध्या मात्र भुजबळ यांनाच आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी चिंता सतावू लागली आहे. सुरू असलेले प्रकल्प पूर्ण होणार की नाही ही देखील समस्या आहे. सध्या सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी निधी मिळावा म्हणून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com