भुजबळांच्या ‘त्या‘ वक्तव्याला येवल्यातून मिळाली दाद!

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीत पदाधिकाऱ्यांचा सहभाग
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

येवला : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या व्हर्चुअल रॅलीत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मुंबई येथून रॅलीचे थेट प्रक्षेपण येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे करण्यात आले होते. २०२४ ला दिल्लीत चमत्कार होईल या पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणाला येवलेकरानी टाळ्यांच्या गजरात दाद देत स्वागत केले.

Chhagan Bhujbal
ओबीसी समाजास हक्कापासून वंचित ठेवून चालणार नाही

पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित व्हर्चुअल रॅली प्रसंगी श्री. पवार यांच्यासह प्रतिभा पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदी प्रमुख नेत्यांसह भुजबळ उपस्थित होते. या रॅलित भुजबळाचे भाषण लक्षवेधी ठरले. संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद पवार साहेबात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला, तसाच चमत्कार २०२४ मध्ये दिल्लीत होईल. त्यासाठी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन राज्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले. भुजबळांच्या या वक्तव्याचे नाट्यगृहात उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देऊन स्वागत केले.

Chhagan Bhujbal
देशाचे राजकारण करायचे अन् गावातला सरपंच ऐकत नाही!

या रॅलीत ज्येष्ठ सहकार नेते अंबादास बनकर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, सदस्य महेंद्र काले, भुजबळ यांचे स्वीय साहेब बाळासाहेब लोखंडे, पंचायत समितीचे गटनेते मोहन शेलार, लासलगाव येथील नेते जयदत्त होळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, गटनेते प्रवीण बनकर, बाजार समितीचे प्रशासक ज्ञानेश्वर दराडे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, मकरंद सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, समता परिषदेचे संतोष खैरनार, विजय जेजुरकर, दिगंबर गोराडे, सचिन सोनवणे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com