

Maharashtra politics : येवला शहर व तालुक्यातील मनसेचे शहर उपाध्यक्ष अक्षय पंडोरे यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज येवला येथील संपर्क कार्यालयात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे शहरात मनसेला धक्का बसला आहे.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत नव्याने प्रवेशकर्त्या पदाधिकाऱ्यांनी युवकांचे संघटन करून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी मनसे येवला शहर उपाध्यक्ष अक्षय पंडोरे, तालुका सचिव आकाश गायकवाड यांच्यासह मंगेश साबळे, चेतन पोळ, महेश गडक यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष दत्ता निकम, येवला नगरपालिकेचे गटनेने दिपक लोणारी, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक जावेद लखपती, प्रवक्ते राजेंद्र भांडगे, युवक शहराध्यक्ष पार्थ कासार, भूषण लाघवे, दीपक गायकवाड दीपक पवार, समाधान पगारे, प्रा.संतोष राऊळ, श्रीकांत वाकचौरे, राकेश कुंभारे, वाल्मीक कुमावत, नवनाथ पोळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारी पक्षसंस्था आहे. येणाऱ्या काळात युवकांच्या बळावर पक्ष अधिक मजबूत होईल. नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटन वाढीसाठी सक्रिय भूमिका घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती देण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
समीर भुजबळ करतील नेतृत्व
दरम्यान, येवल्यात नगपालिका निवडणुकीपासून समीर भुजबळ यांनी लक्ष्य घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी छगन भुजबळ आजारी असल्याने प्रत्यक्ष प्रचारात उतरु शकले नव्हते. नगरपालिका निवडणुकीत समीर यांच्या नेतृत्वात चांगलं यश पक्षाला मिळालं. त्यानंतरही समीर भुजबळांकडून येवल्यात राष्ट्रवादीला अधिक बळकट करण्याचे काम सुरुच आहे. मनसे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश त्याचाच भाग आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर समीर भुजबळ हेच येवला मतदारसंघाचे नेतृत्व करतील असे बोलले जात आहे. नगरपालिका निवडणूक त्याची रंगीत तालीम होती असंही बोललं जातं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.