तुम्ही जल्लोषात मिरवणूक काढा...पोलिस परवानगीचे मी पाहतो!

आमदार सुहास कांदे यांच्या कामाचे आचार्य पुलक सागर यांनी केले कौतुक.
Acharya Pulak sagarji & MLA Suhas Kande
Acharya Pulak sagarji & MLA Suhas KandeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : उद्या महावीर जयंती आहे. यानिमित्त शहरात (Nashik) राष्ट्रसंत पुलक सागरजी (Pulak sagarji) यांच्या उपस्थितीत शोभायात्रा निघणार आहे. त्याला अद्याप परवानगी मिळालेली नव्हती. याबाबत आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी पुलक सागरजी यांच्या कार्यक्रमात सर्वांना आश्वासीत केले. तुम्ही जल्लोषात मिरवणूक काढा. परवानगीसाठी मी स्वतः पोलिस (Police) आयुक्तांना भेटेन.

Acharya Pulak sagarji & MLA Suhas Kande
..आता पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत नाहीत

राष्ट्रसंत पुलक सागरजी यांचा सध्या नाशिकला मुक्काम आहे. यानिमित्त कालपासून येथील धनदाई लॅान्स येथे सकाळी त्यांचे प्रवचन सुरु आहे. आज यानिमित्त आमदार सुहास कांदे यांना आंयोजन समितीचे अध्यक्ष सुमेरकुमार काले व त्यांच्या सहकाऱ्यांनी निमंत्रीत केले होते. यावेळी त्यांनी पुलक सागरजी यांची भेट घेऊन चर्चा केली.

Acharya Pulak sagarji & MLA Suhas Kande
राज ठाकरेंना इशारा... तर हातातल्या बांगड्या काढायाल वेळ लागणार नाही

यावेळी आचार्य पुलक सागरजी म्हणाले, आमदार कांदे यांचा आणि माझा परिचय नाही. कारण आम्हा दोघांचेही क्षेत्र वेगळे आहे. ते राजनितीत आहेत. मी धर्मनितीत आहे. मात्र राजनीतीमध्ये धर्मनीती आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा राजनिती अडखळते तेव्हा धर्मनिती आपला मदतीचा हात देऊन राजनीतीला सावरते. आमदार कांदे यांनीही त्याचे अनुकरण करावे. ते लोकांना पाणी देत आहेत. विविध कामे करीत आहेत. लोकांसाठी परिश्रम घेत आहेत. त्यांचे निश्चितच कौतुक केले पाहिजे.

आमदार कांदे यांनी संयोजकांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, उद्या महावीर जयंती असल्याने शहरातून सकल जैन समाजाची मिरवणूक निघणार आहे. मात्र त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही. मात्र त्याची चिंता करू नये. तुम्ही जल्लोषात मिरवणूक काढा. परवानगीची काळजी करू नका. परवानगी मिळेल. त्यासाठी मी प्रयत्न करीन. गरज पडल्यास स्वतः पोलिस आयुक्तांना भेटून विनंती करीन. राज्यात आपले सरकार आहे. हे सरकार सदैव आपल्या पाठीशी उभे राहील.

यावेळी आमदार कांदे यांनी आचार्य पुलक सागरजी यांनी नांदगावला यावे असे निमंत्रण दिले. ते म्हणाले. आपण आर्शिवाद देण्यासाठी नांदगावला या, आम्ही सर्व भव्य कार्यक्रम करू.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com