...आणि त्यांनी चक्क खासदारांच्या कानशीलात लगावली!

पिंपळगाव बसवंतचा तो शेतकरी लढा राज्यभर चर्चेत होता.
Shetkari Sanghtana
Shetkari Sanghtana Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक : ऊसाला भाव मिळावा (Sugarcane rate) म्हणून नाशिकला (Nashik) शेतकऱ्यांचा (Farmers agitation) मोठा लढा झाला. त्यात पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथे मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको झाला. त्यात वाहतूक ठप्प झाली. यावेळी एक खासदार (MP) गाडीतून उतरून नेत्यांकडे वाहतूक कोंडी बाबात विचारणा करू लागले. यावेळी लढ्याचे नेतृत्व करीत असलेल्या माधवराव मोरे (Madhavrao More) यांनी चक्कया खासदाराच्या कानशीलात लगावली. त्यामुळे हे आंदोलन आणि मोरे यांची चर्चा राज्यभरात पसरली. (That farmers agitation was in discussion in whole state)

Shetkari Sanghtana
गुलाबराव पाटील, तुमच्यावर फडणवीसांनी कोणती भानामती आहे?

(कै) शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेचा विस्तार झाला, त्यात नाशिकचे मोठे योगदान आहे. या योगदानामध्ये निफाड तालुक्यात झालेला ऊस दराचा शेतकरी लढा शेतकरी संघटनेच्या इतिहासातील प्रमुख लढा मानला जातो. त्यात अगदी निफाडचे (खेरवाडी) रेल्वे स्थानक देखील पेटवून देण्यात आले होते.

Shetkari Sanghtana
दिल्लीचं तख्त हादरवणारे झुंजार शेतकरी नेते माधवराव मोरेंचे निधन

याबाबत एक चर्चा आजही सांगितली जाते, ती अशी, या लढ्याचे नेतृत्व विविध नेत्यांपैकी माधवराव खंडेराव मोरे यांच्याकडे देखील होते. माधवराव मोरे हे लढाऊ आणि आक्रमक स्वभावाचे होते. त्याचा प्रत्यय चक्क एका खासदारालाही आला. १९८० मध्ये शेतकरी संघटनेतर्फे मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको झाला. हजारो शेतकरी त्यात सहभागी झाल्याने दिल्लीला जाणारा महामार्ग ठप्प झाला. रस्त्यावर मैलभर लांब वाहनांच्या रांगा होत्या.

यावेळी मालेगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार नाशिकहून आपल्या मतदारसंघाकडे जात होते. ते रास्ता रोकोत अडकले. त्यामुळे ते वाहनातून उतरले. ते चालत पुढे जात होते. यावेळी ते शेतकऱ्यांकडे आंदोलनाबाबत चर्चा करत होते. त्यांची भेट श्री. मोरे यांच्याशी झाली. त्यांनी हात जोडले अन् आंदोलनाबाबत विचारणा केली. त्यांना समोरून अनपेक्षीत प्रतिसाद मिळाला. संतप्त मारे यांनी चक्क त्यांच्या कानशीलात लगावली. त्यामुळे वातावरण एकदम गंभीर झाले. पोलिसांनी खासदारांना तेथून दूर नेले अन् पुढचा प्रसंग टळला. मात्र त्यानंतर हे खासदार अनेकदा चर्चेत अनेकांना स्वतः या प्रसंगाबाबत सांगत असत.

या प्रसंगामुळे शेतकरी संघटनेचा लढा चर्चेत होताच. त्यानंतर माधवराव मोरे यांची चर्चा राज्यभर झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भल्या भल्या नेत्यांच्या तोंडचे पाणी पळवणारे माधवराव मोरे हे शेवटपर्यंत शेतकऱ्यांचे हक्क व आर्थिक विकासासाठी व त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी झटत राहिले.

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक लढा उभारणारे माधवराव मोरे यांची प्रकृती गेली दोन वर्षांपासून खालावली होती. शेतकऱ्यांसाठी छेडलेल्या आंदोलनात झालेल्या पोलिसांच्या लाठ्याचे घाव त्यांना वार्धक्यात असह्य होत होते. पिंपळगाव बसवंतमध्ये १९८० मध्ये कांदा व उसाला हमीभाव मिळावा, यासाठी झालेल्या आंदोलनात शेतकरी व पोलिस यांच्यात धुमचक्री झाली. आंदोलनात गोळीबार झाला; पण ते मागे हटले नाही.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com