VBA : लाडक्या बहिणीच्या वादात 'वंचित'ची उडी, रवी राणांवर थेट कारवाईची मागणी

VBA Ravi rana : लाडकी बहीण योजना ही निवडणुकीवर डोळा ठेवून आणलेली योजना आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. जनतेच्या पैशातून जनतेसाठी सरकार कामं करीत असते, अशी टीका वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
Ravi Rana
Ravi Rana Sarkarnama
Published on
Updated on

VBA News : 'लाडकी बहीण' योजनेवरून राजकारण पेटले आहे. आमदार रवी राणा यांनी जर मला मतं दिलं नाही तर खात्यातून पैसे परत काढून घेईल, असे वक्तव्य केले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राणा यांच्यावर टीका केली होती. तर, महायुतीच्या नेत्यांनी आम्ही तसे काही करणार नसल्याचे स्पष्टकरण दिले होते.

रवी राणांच्या वक्तव्यावरून पेटलेल्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली आहे. 'वंचित'च्या राज्य महासचिव अरुंधती शिरसाठ यांनी थेट रवी राणा यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

अरुंधती शिरसाठ म्हणाल्या, लाडकी बहीण योजना ही निवडणुकीवर डोळा ठेवून आणलेली योजना आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. जनतेच्या पैशातून जनतेसाठी सरकार कामं करीत असते. मात्र, आता हे मालक असल्या सारखे वागू लागले आहेत आणि धमकी सुद्धा देऊ लागले आहेत. मतांचा आशीर्वाद मिळाला नाही तर दीड हजार काढून घेऊ अशी धमकी देणारे मुजोर आमदार रवी राणाचा निषेध करावा तितका कमी आहे .

Ravi Rana
Manoj Jarange Patil : "संपवा-संपवी खात्याचं मंत्री फडणवीसांना करावं, कारण...," जरांगे-पाटलांचा घणाघात

ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना जागा दाखवा

सरकारचा पैसा हा आमचाच आहे याच पैशातून मत विकत घेऊन पुन्हा सत्ताधारी होऊ, अशी मानसिकतता महाविकास आघाडी आणि महायुतीचे घटक पक्ष दोघांची आहे. मत नाही दिले तर खात्यातून पैसे परत घेऊ हे ब्लॅकमेलिंग आहे आणि 'वंचित' या बेबंदशाहीचा तीव्र निषेध करते. जनतेला ब्लॅकमेल करणाऱ्या आमदार रवी राणावर सरकारने कारवाई करावी, अशी शिरसाठ यांनी केली.

काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

लाडक्या बहिणींना धमकी दिल्याचे काय परिणाम होतात ते आता रवी राणा आणि त्याचे पाठीराखे असलेल्या मुजोर सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रातील सगळ्या बहिणी दाखवून देतील, असा इशारा शिरसाठी यांनी दिला आहे. तसेच राणा यांच्या पत्नीला 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडून दिले होते हे लोक विसरणार नाहीत, असा टोला लगावला.

Ravi Rana
Balasaheb Thorat : तीन तलवारी एका म्यानात, कशा राहतील? तिसऱ्याची धडपड बघा; थोरातांनी अजितदादांना डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com