
Ghibli-style photos controversy : 'AI'च्या मदतीने दहशतवादी हल्ल्यातील पीडित लोकांचे घिबिली शैलीत फोटो करून त्याचा वापर द्वेषपूर्ण प्रचारासाठी भाजप करत असल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला.
अशा संकट काळात सत्ताधारी भाजपचे कान टोचताना, मदतकार्य आणि सीमा सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असा मोलाचा सल्ला यावेळी सुजात आंबेडकर यांनी दिला.
जम्मू काश्मीरमधील पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या पहलगाम इथं गेल्या सहा वर्षांतील मोठा दहशतवादी (Terror) हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली असून, त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटू लागले आहेत. या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटक मारले गेले आहेत, तर अनेक जण जखमी देखील झाले आहेत.
केंद्रातील मोदी (Narendra Modi) सरकारने युद्धपातळीवर पीडितांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. यातच हल्ल्यातील पीडितांचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यातील काही फोटो 'AI'च्या मदतीने 'घिबली' शैलीत रुपांतर करून त्यातून द्वेषपूर्ण प्रचार केला जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी यावरून सत्ताधारी भाजपला फटकारलं आहे. नाराजी व्यक्त करताना, सत्ताधारी भाजपने पीडितांना मदतकार्य आणि सीमा सुरक्षेला प्राधान्य द्वावे, असा सल्ला देणारी पोस्ट एक्स खात्यावर पोस्ट केली आहे. अशा संकटात मनात विचार देखील कसा येऊ शकतो की, हल्ल्याचे फोटो वापरून द्वेष पसरावा, संकट काळात समाजात एकता आणि सहकार्याची भावना वाढवणे आवश्यक आहे. द्वेष प्रचार नव्हे, अशी टीका भाजपवर सुजात आंबेडकर यांनी केली.
या द्वेष प्रचाराविरोधात समाजिक संघटनांबरोबर राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून चर्चा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.