नागपुरातील दोन आमदार, माजी महापौर यांच्यासह 104 नेते आज शांत झोपणार

नागपूर महापालिकेतील क्रीडा साहित्य गैरव्यवहारातून या नेत्यांची निर्दोष सुटका
Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal CorporationSarkarnama

नागपूर : नागपूर महापालिकेतील (Nagpur Municipal Corporation) गाजलेल्या क्रीडा साहित्य घोटाळ्यात आरोपी असलेल्या नगरसेवकांसह, महापालिकेतील अधिकारी, दुकानदार अशा एकूण १०४ जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. (Nagpur District court) त्यामुळे २२ वर्षांपूर्वी नगरसेवकांवर लागलेला घोटाळ्याचा कलंक मिटला आहे.

आरोपी नगरसेवकांमध्ये विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर कल्पना पांडे, माजी उपमहापौर रवींद्र भोयर, शेखर सावरबांधे यांच्यासह ६ साहित्य दुकानदार आणि ४ महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. याच घोटाळ्यामुळे भाजपला महापालिकेची सत्ता गमवावी लागली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन. जी. देशपांडे यांनी निर्णय मंगळवारी उपरोक्त निर्णय दिला.

Nagpur Municipal Corporation
Sarkarnama Open Mic Challenge: मोदींची तुलना फक्त नेहरूंशीच: आ. परिणय फुके

नागपूर महापालिकेत क्रीडा साहित्य घोटाळ्याच्या चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी नंदलाल कमेटीची स्थापना केली होती. नगरसेवकांनी क्रीडा मंडळांना साहित्य देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका नंदलाल यांनी अहवालात ठेवला होता. याप्रकरणी सुरुवातीला सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात भाजपसह काँग्रेस, रिपाई आणि काही अपक्ष नगरसेवकांचाही समावेश होता. दरम्यान, क्रीडा साहित्य घोटाळ्याची व्याप्ती अधिक असल्याने राज्य सरकारने क्रीडा साहित्य घोटाळ्याची चौकशी गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केली होती. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात भांदविच्या कलम ४२०, ४०४ आणि ४६८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. केलेली मागणी ही नगरसेवकांची असली तरी पुरवठा करण्याची जबाबदारी ही महापालिकेची होती, असा युक्तीवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला. तसेच, नंदलाल समितीचा अहवाल आणि साक्ष सरकारी पक्षाने नोंदविली नसल्याने याचा फायदा आरोपींना झाला.

Nagpur Municipal Corporation
Sarkarnama open mic : खासदार जलील यांना कठीण प्रश्न आणि त्यांची चपखल उत्तरे

अशी झाली घोटाळ्याला सुरुवात

महापालिकेच्या आमसभेत शहरात क्रीडा मंडळांना साहित्य पुरवठा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्याकरिता शहरातील चार क्रीडा साहित्य विक्रेत्यांची निवड करण्यात आली होती. क्रीडा मंडळांना थेट त्या दुकानदारांकडून क्रीडा साहित्याचे प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले होते. तर क्रीडा मंडळांना साहित्य पुरवठा करण्याला नगरसेवकांच्या शिफारशीने क्रीडा अधिकारी मंजुरी देत होते. त्या मंजुरीनंतर क्रीडा मंडळांना साहित्य पुरवठा करण्यात येत होता. तर दुकानदारांनी नंतर महापालिकेकडे देयके सादर करावीत, असे योजनेत ठरले होते.

मात्र, क्रीडा मंडळांना साहित्य न देताच परस्पर दुकानदारांकडून देयके सादर होऊ लागली. त्यात नगरसेवकांच्या शिफारशी केलेल्या मंडळांना साहित्य तर मिळाले नाहीच, शिवाय काही मंडळेदेखील बोगस असल्याचे निदर्शनास आले. ही बाब तत्कालीन महापालिका आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या निदर्शनास आली होती. त्यांनी थेट राज्य सरकारकडे महापालिकेतील घोटाळ्याची तक्रार केली. तेव्हा राज्य सरकारने नंदलाल यांना चौकशीचे आदेश दिलेत. चौकशीत क्रीडा साहित्य घोटाळा झाल्याचे आढळून आल्यानंतर तत्कालीन अधिकारी रिझवान सिद्दीकी यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी क्रीडा मंडळे, दुकानदारांकडे धाड टाकून तपासणी केली.

Nagpur Municipal Corporation
निवडणुकांची लगबग सुरू : 14 महापालिकांची अंतिम प्रभागरचना 17 मे रोजी जाहीर होणार

प्रमुख नगरसेवक होते आरोपी

या घोटाळ्यामध्ये तत्कालीन नगरसेवकांमध्ये कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, दयाशंकर तिवारी, कल्पना पांडे, रवींद्र भोयर, अर्चना डेहनकर, बळवंत जिचकार, प्रभाकर येवले, बंडू पारवे, राजू बहादुरे, धरम पाटील, मनोहर थूल, सुभाष राऊत, संजय हेजिब, विक्रम पनकुले, दिलीप पनकुले, रमेश सिंगारे, जैतुनबी, मंदा भुसारी, यशवंत मेश्राम, मनीषा दलाल, सुलभा दाणी, नीलिमा गडीकर, सविता काळे, अनिल धावडे, प्रमोद पेंडके, पांडुरंग भानारकर, सिंधू देहलीकर, नंदू घाटे, पुष्पा घोडे आदींचा समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com