Coal Mine Scam
Coal Mine ScamSarkarnama

मॉनिटरींगच्या नावावर ३०० कोटींचा कोळसा घोटाळा, सुभाष देसाईंना दिली माहिती...

अशाप्रकारे सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची सर्व माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई Minister Subhash Desai यांना देण्यात आली असल्याची माहिती प्रशांत पवार Prashant Pawar यांनी दिली.

नागपूर : खाणीतून कोळसा निघाल्यावर तो कोलवॉशरीत स्वच्छ करून नंतर पॉवर प्लान्टला त्याचा पुरवठा करायचा असतो. याची देखरेख करण्यासाठी महाजेनकोने एमएसएमसी (महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन) ची नेमणूक केली. त्यानंतर एमएसएमसीने ‘एक्सवायकेएनओ’ या कंपनीची देखरेखीसाठी नेमणूक केली. यामधून एमएसएमसीच्या संचालक व अधिकाऱ्यांनी मिळून ३०० कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी केला.

पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, महाजेनकोला औष्णिक वीज निर्मितीसाठी महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशनच्यावतीने केल्या जाणाऱ्या कोळसा पुरवठ्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सुरू आहे. याची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे. सोबतच त्यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही सांगितले. महाजेनकोला औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची आवश्यकता असते. कोळशाच्या पुरवठ्यासाठी महाजनेकोने एमएसएमसीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली.

एमएसएमसीने कोळशाचा पुरवठा आणि वॉशरीसाठी ‘एक्सवायकेएनओ’ कंपनीची निविदा मंजूर केली. यानंतर एमएसएमसीने कोळशाचा पुरवठा, वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी एका कंपनीची नेमणूक करण्यात आली. या कंपनीला फक्त देखरेखीसाठी २२ रुपये ८३ पैसे प्रतिटन कमिशन दिले जाते. हा खर्च कोळसा पुरवठादार कंपनीमार्फत केला जात आहे. विशेष म्हणजे कोल वॉशरीचा काही उपयोग नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर १० वर्षांपासून बंद असलेल्या कोल वॉशरी पुन्हा पुनरुज्जीवित करण्यात आल्या.

३०० कोटींचे कमिशन

प्रायमस सॅम प्रा.लि. कंपनीला मॉनिटरिंगसाठी २२ रुपये ८३ पैसे प्रतिटन कमिशन दिले जाते. महिन्याला अडीच कोटी टन कोळशाचा पुरवठा केला जातो. त्यानुसार वर्षाला ६० कोटी यानुसार पाच वर्षांसाठी ३०० कोटी रुपये देण्यात येणार आहे. हा सर्व व्यवहार भाजपच्या कार्यकाळात झाला. अशाप्रकारे सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची सर्व माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना देण्यात आली असल्याची माहिती प्रशांत पवार यांनी दिली.

Coal Mine Scam
मोठी बातमी : देशातील कोळसा टंचाईची खुद्द केंद्रीय कोळसा मंत्र्यांनीच दिली कबुली

१३० वॅगन कोळसा गायब

महाजनकोने निकृष्ट दर्जामुळे नाकारलेल्या कोळशाच्या १३० वॅगन गायब झाल्या आहेत. हा कोळसा कुठे गेला, कोणाला विकला याचा कोणाकडे हिशेब नाही. हीच या व्यवहारातील मोठी गोम आहे. याच प्रमुख कामाकरिता मॉनिटरिंग कंपनी नेमण्यात आली आहे. गायब झालेला कोळसा चांगल्या दर्जाचा होता. तो खुल्या बाजारात चढ्या भावाने विकण्यात आल्याचा आरोपही प्रशांत पवार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com