अकोल्यात सव्वा कोटींच्या साहित्यासह 65 हजार बायोडीझल जप्त; आरोपींना अटक

प्रतिबंधित असलेले बायोडिझलची अकोल्यातील (Akola) मलकापूर शिवारात विक्री केली जात होती.
Akola Police

Akola Police

Sarkarnama

अकोला : प्रतिबंधित असलेले बायोडिझल विक्री करणार्‍या पंपावर स्थानिक गुन्हे शाखेने (Akola Police) छापा टाकून एक कोटी 26 लाख 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चौघांना अटक (Arrested) केली असून दोन जण अजूनही फरार आहेत. या दोघांचा शोध पोलिस घेत आहे. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

<div class="paragraphs"><p>Akola Police</p></div>
न्यायालयातील बॉम्बस्फोटामागे पाकिस्तान? गुप्तचर यंत्रणांना आधीपासून होती खबर

प्रसन्न अजय तापडीया यांचे मलकापूर शिवारात मलकापूर येवता जाणार्‍या रस्त्यालगत शेत सर्वे नं. 74 हे शेत त्यांनी अभय अनुप राठी यास भाडेपट्ट्यावर दिले आहे. तसेच, संगणमत करून त्याठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेल्या बायोडिझल, रिनेबल डिझल हे मानवी जिवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने पेट्रोलजन्य ज्वलनशिल डिझल विक्री करीत आहे. अशी माहिती मिळाली. यानंतर या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी याठिकाणी छापा टाकला. या छाप्यामध्ये टँकर एमएच - 46 - बीएम - 2331 किंमत 30 लाख रूपये ज्यामध्ये 30 हजार लिटर बायोडीझल किंमत 24 लाख रुपये, 16 लाख रुपयांचे 20 हजार लिटर बायोडिझलने भरलेला टँकर क्रमांक एमएच - 30 - एल - 2087 किंमत 25 लाख, चार हजार लिटर बायोडिझल किंमत 3 लाख 20 हजार रुपये व टँकर क्रमांक एमएच 30-एल - 1751 किंमत 25 लाख रुपये हे जप्त केरण्यात आले आहे. तसेच, दोन डिस्पेंशन मशीन किंमत तीन लाख रुपये, दोन इलेक्ट्रीक मोटर पंप किंमत 16 हजार व इतर साहित्य असा एकूण एक कोटी 26 लाख 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

<div class="paragraphs"><p>Akola Police</p></div>
राज्यात निर्बंध लागण्याची शक्यता ; आज नवी नियमावली जाहीर होणार

याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये रोहन नंदु बिटनी, शेख समीर शेख हज, जावेद हुसेन सफदर हुसेन, जयहिंद ज्ञानोबा सानप, यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, प्रसन्न अजय तापडीया व अभय अनुप राठी हे दोघे अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, संतोष गवई, मोन्टी यादव, शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, उदय शुक्ला, पवन यादव, नफीज शेख, विजय कबले, गणेश सोनवणे, गिता अवचार, सतीश गुप्ता, सुशिल खंडारे आदींकडून करण्यात आली आहे. पुढील तपास खदान पोलिस ठाणे पोलिसांकडून सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com