न्यायालयातील बॉम्बस्फोटामागे पाकिस्तान? गुप्तचर यंत्रणांना आधीपासून होती खबर

या हल्ल्यात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
Ludhiana Court Blast

Ludhiana Court Blast

Sarkarnama 

Published on
Updated on

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना जिल्हा न्यायालयात गुरूवारी झालेल्या बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुप्तचर यंत्रणांना याबाबतची खबर आधीच हाती लागली होती. त्यानुसार अलर्टही जारी करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

लुधियाना जिल्हा न्यायालयाचे (Ludhiana High Court) कामकाज सुरू असतानाच दुसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात मोठा स्फोट (Blast in Court) झाला. या स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने संपूर्ण न्यायालय परिसर हादरून गेला होता. या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी तातडीने शोधमोहिम हाती घेतली आहे. गुप्तचर यंत्रणांना हल्ल्याबाबत आधीपासूनच माहिती असल्याचे समोर आले आहे. त्यांनी आतापर्यंत तीन अलर्ट जारी केले होते.

<div class="paragraphs"><p>Ludhiana Court Blast</p></div>
निवडणुका लांबणार? आता उच्च न्यायालयाचीच थेट मोदी अन् आयोगाला सूचना

पाकिस्तानच्या आयएसआय (ISI) या गुप्तचर संघटनेसह (Intelligence Agencies) पाकिस्तानचे (Pakistan) समर्थन असलेल्या बब्बर खालसा (Babbar Khalsa) या संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इंडिया टुडे या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. पंजाबमध्ये (Punjab) एखाद्या गर्दीच्या ठिकाणी किंवा महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा कट होता. याबाबत 9 जुलै, 7 डिसेंबर आणि 23 डिसेंबर रोजी अलर्ट हा हल्ला होईल, असा अलर्ट देण्यात आला होता. अलर्ट दिलेल्या दिवशीच हल्ला झाल्याने गुप्तचर यंत्रणांचा पाकिस्तान कनेक्शनचा संशय खरा असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

<div class="paragraphs"><p>Ludhiana Court Blast</p></div>
अनिल देशमुखांची पुन्हा चैाकशी होणार ; क्लीन चीट अहवाल लीक

फॉरेन्सिक टीम आणि बॉम्ब शोध पथकाने प्राथमिक तपासानंतर या हल्ल्यासाठी उच्च दर्जाच्या स्फोटकांचा वापर झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये पीईटीएन किंवा आरडीएक्स वापर केलेला असू शकतो, असं सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहे. नवीन वर्ष तसेच पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर हा हल्ला झाल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com