‘या’ कारणामुळे दोन आमदारांमधील वाद भडकला, पोलिसात तक्रार...

पूर्व नागपूरचे (Nagpur) आमदार कृष्णा खोपडे यांच्या घराजवळ सतरंजीपुरा प्रभागात विधान परिषदेचे सदस्य ॲड. अभिजित वंजारी (abhijeet waanjari) यांनी आपल्या निधीतून तीन वेगवेगळ्या कामाचे भूमिपूजन केले.
Abhijeet Wanjari
Abhijeet WanjariSarkarnama

नागपूर : राजकीय पुढारी म्हटला की केलेल्या कामांचे श्रेय घेणारच. पण न केलेल्या कामांचेही श्रेय घेण्याची स्पर्धा हल्ली पुढाऱ्यांमध्ये लागलेली दिसते. मग त्यातून वाद, भांडणे होतात. असाच प्रकार पूर्व नागपूरमध्ये सध्या सुरू आहे. एका कामावरून दोन आमदारांमध्ये (MLAs)वाद पेटला आहे. एका आमदाराने दुसऱ्याची पोलिसात तक्रार केल्याने तो आणखीनच चिघळला आहे.

पूर्व नागपूरचे (Naagpur)आमदार कृष्णा खोपडे यांच्या घराजवळ सतरंजीपुरा प्रभागात विधान परिषदेचे सदस्य ॲड. अभिजित वंजारी (Abhijeet Wanjari) यांनी आपल्या निधीतून तीन वेगवेगळ्या कामाचे भूमिपूजन केले. दोन्ही आमदारांमध्ये सध्या चांगलाच वाद सुरू आहे. तो आणखी उफाळण्याची शक्यता आहे. पूर्व नागपूरमध्ये महापालिकेच्या (Municipal Corporation) पाकांवर आमदार खोपडे यांच्या नावाच्या पाट्यांवर काळे फासून अभिजित वंजारी यांचे नाव टाकले जात असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफाळून आला होता. खोपडे यांनी याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली होती. दोनच दिवसांपूर्वी पूर्व नागपूरला राज्य सरकारने (State Governent) विकास कामांसाठी दिलेला निधी असल्याचा दावा वंजारी यांनी केला होता. मात्र आमदार खोपडे तो आपण आणल्याचा दावा करीत आहेत. यावरून वंजारी यांनी एका अधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याचा आरोप खोपडे यांचा आहे.

महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला दरडावत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून खोपडे यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करून वंजारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या वादाच्या पर्श्‍वभूमीवर वंजारी यांच्या हस्ते सतरंजीपुरा प्रभागात झालेल्या भूमिपूजनाला नगरसेवक नितीन साठवणे, माजी नगरसेवक नेताजी साकोरे, ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्‍वर ठाकरे, राजेश पौनीकर, युवराज वैद्य, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गेंदलाल बरबटे आदी उपस्थित होते. मूलभूत सोईसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत शासनाकडून ९१ लाखांचा निधी आपण मंजूर करून आणला असल्याचे यावेळी वंजारी यांनी सांगितले.

Abhijeet Wanjari
बंडाळीच्या परिस्थितीत नागपूर, यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत !

नितीन साठवणे यांनी केलेल्या मागणीनुसार २१ कामे मंजूर झाली आहेत. यातून हनुमान मंदिर किराडपुरा, सुभाष पुतळा व सतरंजीपुरा परिसरातील माया कोठे यांच्या घरापासून शिवाजी ननोरे व नेताजी साकोरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम केले जाणार आहे. तसेच तेलीपुरा व सतरंजीपुरा येथील संजय हटवार यांच्या घरापासून धर्मेंद्र वंजारी यांच्या घरापर्यंत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाची पाहणी करून या दोन सिमेंट रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन आमदार वंजारी यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com