भंडारा जि.प. उपाध्यक्षांसह ३ सदस्य अडचणीत; अ‍ॅट्रॉसिटी अन् विनयभंगाचा गुन्हा दाखल

Bhandara | भंडाऱ्यातील सत्ता स्थापनेचा वाद टोकाला
Sandip Tale - Nandu Rahangdale
Sandip Tale - Nandu RahangdaleSarkarnama
Published on
Updated on

भंराडा : भंडारा जिल्हा परिषदेत मागील ४ दिवसांपासूनसुरु असलेला सत्ता स्थापनेनंतरचा वाद आता टोकाला गेला आहे. भाजपचे (BJP) निलंबित माजी आमदार चरण वाघमारे यांच्या फुटीर गटातील उपाध्यक्ष संदिप टाले (Sandip Tale) यांच्यासह तीन सदस्यांवर अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंग आणि मारहाण या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या महिला सदस्या माहेश्वरी नेवारे यांना सभागृहातच मारहाण केल्याचा आरोप या तिघांवर करण्यात आला असून या प्रकरणी स्वतः नेवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसने (congress) भाजपचे निलंबित माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाशी हातमिळवणी केली. यानंतर अध्यक्षपदी काँग्रेसचे काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या फुटीर गटाचे अर्थात चरण वाघमारे यांच्या गटाचे संदीप टाले विजयी झाले. जिल्हा परिषदेत नाना पटोले यांना पर्यायाने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपलाभाजपचे आमदार परिणय फुके आणि खासदार सुनिल मेंढे यांच्या गटाला हाताशी धरून सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. मात्र, सदस्यच फुटल्याने असल्याने त्यांना शेवटपर्यंत संख्याबळ जुळवता आले नाही.

Sandip Tale - Nandu Rahangdale
केतकी चितळे विरोधात कळव्यात पहिला गुन्हा दाखल; पोलिस आजच ताब्यात घेण्याची शक्यता

भाजपच्या या दोन गटात त्याचवेळी वादाची ठिणगी पडली. १० मे रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सभागृहात पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संदीप कदम हजर होते. यावेळी भाजपच्या दोन गटात सभागृहातच वाद निर्माण झाला. यानंतर दोन्ही गट एकमेकांवर भिडल्याचे आणि सदस्यांमध्येच हाणामारी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Sandip Tale - Nandu Rahangdale
`अहो मिडियाला कळते ते तुम्हाला का कळत नाही`

याच प्रकरणी महिला सदस्या माहेश्वरी नेवारे यांच्या तक्रारीवरून उपाध्यक्ष संदीप टाले यांच्यासह सभापती नंदू रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्याविरोधात कलम 354, 354 (अ), 294,323, 34 भादवी सहकलम 3 (1) (आर) (एस) 3 (2) (डब्ल्यू) (1) (2)3(2) (विए) अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याचवेळी संदीप टाले यांच्या तक्रारीवरून भाजप सदस्य विनोद बांते, प्रियांक बोरकर, गणेश बोरकर, माहेश्वरी नेवारे या चौघांविरुद्ध भंडारा पोलिसांत 294 ,323 ,506 कलम 34 भादवी नुसार मारहाण आणि अन्य आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com