Bhandara Gram Panchayat Election: सरपंचपदाच्या महिला उमेदवाराने दिला असा जाहीरनामा, ज्याची जिल्हाभर चर्चा !

Bhandara News: त्यांनी चक्क त्याला नोटरी करत शासकीय अधिकृतता मिळवून दिली आहे.
Bhandara
BhandaraSarkarnama
Published on
Updated on

Grampanchayat Election News : भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. आता या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम राहिला नाही. असाच एक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे. एका सरपंचपदासाठी निवडणुकीत उभ्या असलेल्या महिला उमेदवाराने असा जाहीरनामा दिला आहे की, ज्याची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सोमनाळा गावातील सरपंचपदाच्या महिला उमेदवार छबू वंजारी यांनी आपला जाहीरनामा चक्क १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर (Stamp Paper) लिहून दिला आहे येवढेच नव्हे तर तोसुद्धा नोटरी करून दिला आहे. अशा शासकीय दस्तावेजावर अधिकृत करून दिलेल्या या जाहिरनामाची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. छबू वंजारी बी. एससी, एम. एस. डब्ल्यू. शिकलेल्या आहेत. येत्या १८ डिसेंबरला होणाऱ्या ८ सदस्यीय (७+१) सोमनाळा ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat) सरपंचपदाच्या (Sarpanch) निवडणुकीच्या रणसंग्रामात त्यांनीही उडी घेतली आहे. गावात स्थानिक पातळीवरील दिग्गज स्थानिक नेते असताना आपण निवडणुकीत (Election) उभे असल्याने १२०० लोकसंख्या असलेल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी चक्क आपला जाहीरनामा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर लिहून दिला आहे.

येवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी चक्क त्याला नोटरी करत शासकीय अधिकृतता मिळवून दिली आहे. दोन पानी लिहिलेला जाहीरनामा आपण निवडून आल्यास आपल्याला बंधनकारक असणार असल्याचे या उमेदवारी बाई सांगत फिरत आहेत. लोक मतदाराच्या भरवशावर निवडणूक येतात व त्याच मतदारांच्या विकास कामांचा त्यांना विसर पडतो. म्हणून मतदार उमेदवाराकडून नाराज असल्याने मतदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण असे केल्याचे वंजारी बाई सांगतात. त्यामुळे हा जाहीरनामा केवळ आपल्याला नाही तर आपल्या पूर्ण पॅनलसाठी बंधनकारक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

Bhandara
Grampanchyat Election : मुंडेचा `गड` असलेल्या पांगरीची ग्रामपंचायत धनंजय यांच्या ताब्यात..

मतदाराला आकर्षीत करण्यासाठी कोण काय, करेल याचा नेम नाही. असाच प्रयत्न सोमनाळा येथील सरपंचपदाच्या महिला उमेदवार छबू वंजारी यांनी केला. मात्र निवडून आल्यावर त्यांना आपल्याच जाहिरनाम्याचा विसर पडल्यास हा नोटरी केलेला जाहीरनामा त्यांच्याच अंगलट येईल, ही शक्यतादेखील नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com