Rahul Narvekar : विधानभवनाची नवीन इमारत बांधायची आहे, पण जागा अपुरी पडते...

सध्याची जागा अपुरी पडत असल्याने लगतची जागा अधिग्रहित करण्याबाबत शासनाला सूचना करण्यात येणार असल्याची माहिती नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
Rahul Narvekar
Rahul NarvekarSarkarnama

नागपूर : १९ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात (Nagpur) होणार आहे. येथे अधिवेशनासाठी नवीन इमारतीचे बांधकाम करण्याचा विचार सुरू आहे. पण जागा अपुरी पडते. त्यामुळे लगतची जागा अधिग्रहीत करावी लागेल, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

विधानभवन परिसर (Assembly) अधिक प्रशस्त होणार आहे. येथे नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येईल. सध्याची जागा अपुरी पडत असल्याने लगतची जागा अधिग्रहित करण्याबाबत शासनाला सूचना करण्यात येणार असल्याची माहिती नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. १९ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. त्यासाठी व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधान भवनाची पाहणी केली. त्यानंतर प्रेस क्लब येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, दोन वर्षानंतर अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन किती दिवस चालणार याचा निर्णय सरकार घेईल. विदर्भाच्या (Vidarbha) प्रश्नांना प्राधान्याने न्याय देण्याचा प्रयत्न राहील. तारांकित प्रश्नांचा क्रम लॉटरीनुसार लागतो. त्यामुळे विदर्भातील प्रश्न प्राधान्यक्रमाने घेता येत नाही. परंतु इतर आयुधांच्या माध्यमातून सदस्यांकडून प्रश्न उपस्थित झाल्यास त्याला नक्की न्याय देण्यात येईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा विषय सरकारचा असल्याचे सांगत यावर जास्त बोलण्याचे टाळले. विधान भवन परिसरात नवीन बांधकाम करायचे आहे. परंतु सध्याची जागा अपुरी आहे. त्यामुळे लगतची जागेचे अधिग्रहण करण्याच्या सूचना शासनाला करण्यात येतील. जागेबाबत दोन, तीन प्रस्ताव असून ते शासनाला देण्याच्या सूचना विभागाला दिल्या. एक नवीन सेंट्रल हॉल तयार करण्याचेही प्रस्तावित आहे. याबाबत पुढील बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

Rahul Narvekar
assembly speaker election : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोण आहेत ?

सभागृहात लागणार नवीन प्रणाली..

सभागृहात ऑडियो कन्व्हर्टर प्रणाली बसविण्याचे निर्देश अध्यक्ष नार्वेकर यांनी दिले. ही प्रणाली मुंबईच्या विधानसभा व विधान परिषदेत लावण्यात आली आहे. यानुसार सभागृहात सदस्यांकडून उपस्थित करण्यात येणारे मुद्दे थेट कॉम्प्युटरमध्ये टाइप होतील. यामुळे सदस्यांचे संभाषण लिहिण्याची गरज भासणार नाही.

आमदार निवास आमदारांसाठीच असावे..

अधिवेशन काळातच आमदार निवासाचा वापर होतो. त्यामुळे इतर काळात त्याचा हॉटेल म्हणून वापर करण्याचा विचार प्रशासनाचा असेल. आमदार निवास हे आमदारांसाठी आहे. त्यामुळे इतर कामांसाठी त्याचा वापर होता नये, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com