Banner Protest : ‘आप’च्या बॅनरचा नेत्यांना ताप; मनपाला लावावा लागला अखेर चाप

Action Taken : मनपाने काढले शहरभर लावलेले फलक
Posters in Chandrapur
Posters in ChandrapurSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Politial News : आम आदमी पार्टीनं चंद्रपूरात शहरभर केलेल्या बॅनरबाजीमुळं नेत्यांना चांगलाच ताप झाला. ही बॅनरबाजी नेमकी कुणासाठी होती, याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी ‘समझनेवाले को ईशारा काफी होता है..’ असं नमूद करीत ‘आप’नं नेत्यांना चिमटे काढले. शहरभर लागलेल्या या बॅनर्समुळं चंद्रपूरकरांचे मात्र चांगलेच मनोरंजन झालं. अखेर डोक्याला ताप आणणाऱ्या बॅनरबाजीला चंद्रपूर महापालिकेला चाप बसवावा लागला.

‘ब्लॅक गोल्ड सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरला वीजनिर्मितीचे वरदान लाभले आहे. येथील वीज देशाच्या आर्थिक राजधानीला ऊर्जा देते. पण स्थानिकांना मोठी किंमत मोजत वीजबिलं भरावी लागतात. हे चित्र विदर्भात सर्वत्र आहे. नेमक्या याच मुद्द्यावर आम आदमी पार्टीनं फलकबाजी करीत सामान्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीचा काळ जवळ येत असल्यानं आता आम आदमी पार्टीही विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय झालीय. अलीकडेच त्यांनी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधून झाडू यात्रा काढली. आता हा पक्ष प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील स्थानिक मुद्द्यांना घेऊन अशाप्रकारचे आगळेवेगळे आंदोलन करीत आहे. (Aam Aadmi Party's placards caught the attention of the citizens of Chandrapur)

दिवाळीच्या अगोदर आम आदमी पार्टीनं चंद्रपूर शहरात फोडलेले हे राजकीय फटाके सामान्य नागरिकांत चर्चेचा विषय ठरत आहेत. आम आदमी पार्टीनं फलक उभारण्यासाठी चंद्रपूर महापालिकेकडून रितसर परवानगीदेखील घेतली होती. मात्र, अशा आशयाचे बॅनर लावण्याची परवानगी ‘आप’नं मिळवली होती का, याबद्दल स्पष्टता नाही. बॅनरवर चौफेर टीका झाल्यानं अखेर महापालिका प्रशासनानं हे बॅनर उतरविले आहेत. विदर्भाच्या मातीत वीजनिर्मिती होते. तरीही येथील जनतेला महागड्या दरात वीज खरेदी करावी लागते. आम्ही या प्रकाराचा निषेध करतो, असं आम आदमी पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार या वेळी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम आदमी पार्टीनं दिल्लीतील नागरिकांना मोफत वीजपुरवठा केला आहे. यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी योग्य नियोजन तयार केलंय. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती होते. परंतु चंद्रपूरसह विदर्भातील नागरिकांना जास्त दराने वीज खरेदी करावी लागते. याशिवाय वीज गळती, थकबाकीच्या नावाखाली भारनियमनही याच भागांमध्ये राबविण्यात येतं. त्यामुळं या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दिल्लीप्रमाणे येथेही वीज मिळायला हवी, अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे.

महाराष्ट्रातही दिल्लीच्या धर्तीवर वीजपुरवठा केला जाऊ शकतो, असा ‘आप’चा अनेक दिवसांपासूनच दावा आहे. आपल्या या दाव्यावर पुष्टी करण्यासाठी पार्टीनं आकडेवारीसह वीज वितरण कशा पद्धतीनं होऊ शकते हे सादर केलंय. परंतु दिल्ली व त्यानंतर पंजाब वगळता अद्याप कोणत्याही राज्यानं यासंदर्भात विचार केलेला नाही.

(Edited by : Prasannaa Jakate)

Posters in Chandrapur
Chandrapur Bank : कोर्टाच्या आदेशाने सर्वांचा जीव वरतीखालती, मेसेजने सांगितले पुढे ढकला भरती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com