एमपीएससीचा पेपर फुटल्याचा आरोप करीत, अभिविप आणि भाजयुमोचा गोंधळ...

शहरातील (Nagpur) हनुमाननगर परिसरातील साउथ पॉइंट स्कूलच्या (School) केंद्रावर एमपीएससी पूर्व परीक्षेचा पेपर होता.
MPSC Exam Nagpur
MPSC Exam NagpurSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : एमपीएससीची पूर्व परीक्षा काल पार पडली. शहरातील साउथ पॉइंट स्कूल या केंद्रावर पेपर फुटल्याचा आरोप करीत भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM)आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. पण पेपर फुटलाच नसल्याचा दावा राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC)नंतर केला. अभाविप मात्र आपल्या आरोपावर ठाम होते. त्यांनी या परीक्षा केंद्रावर चांगलाच गोंधळ घातला.

शहरातील (Nagpur) हनुमाननगर परिसरातील साउथ पॉइंट स्कूलच्या (School) केंद्रावर एमपीएससी पूर्व परीक्षेचा पेपर होता. या केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नसंच फुटला असल्याचा आरोप करीत, अभाविपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रप्रमुखांना जाब विचारण्यासाठी केंद्रापुढे आंदोलन सुरू केले. याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनीही केंद्र गाठून आंदोलनास सुरुवात केली. केंद्रप्रमुखांना जाब विचारत आग्रही भूमिका घेतली. मात्र, पोलिसांना पाचारण करण्यात आले. दोन्ही संघटनांचे पदाधिकारी ऐकत नसल्याचे दिसून येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत समज देऊन सोडून दिले.

अभाविपचा दावा..

सकाळी परीक्षा केंद्रामधून एका विद्यार्थ्याने केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचे सील फोडल्याची माहिती अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते केंद्रावर पोहोचले असता या प्रकाराबाबत केंद्रप्रमुखांना पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली. त्यावेळी केंद्रप्रमुखाने सर्व विद्यार्थ्यांसमोरच पेपरचे सील फोडल्याची माहिती दिली. मात्र, यावर आक्रमक पवित्रा घेत, आंदोलनास सुरुवात केली. मात्र, केंद्रावरील बहुतांश विद्यार्थ्यांनी कुठल्याच गैरप्रकार निदर्शनास आला नसल्याचे सांगितले. दरम्यान आंदोलकांनी केंद्रावरील लिपिक आणि केंद्रप्रमुखाच्या निलंबनाची मागणी केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे स्पष्टीकरण..

अभाविप आणि भाजयुमोच्या आंदोलनाची माहिती मिळताच, याप्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने असा कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसे ट्विट आणि अधिकृत पत्रही त्यांनी काढले. याशिवाय समाजमाध्यमांवर पेपर फुटल्याची प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे. अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले.

MPSC Exam Nagpur
आनंदाची बातमी : ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत एका वर्षाची सवलत

जिल्ह्यात १२ हजारांवर विद्यार्थी..

नागपूर जिल्ह्यात ३२ केंद्रांवर राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. यात जिल्ह्यातील १२ हजार १८३ विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेला हजेरी लावली. कोविड प्रोटोकॉलचे पालन करून आज परीक्षा घेण्यात आली. राज्यात ७२४ केंद्र व ३७ जिल्हा केंद्रांवर २ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांसाठी राज्य लोकसेवा आयोगातर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. लेखी परीक्षा सुरळीत पार पाडण्यात आली. कोविड काळामुळे वय आधिक्य झालेल्या उमेदवारांना संधी देण्यासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षांची मुदत वाढविण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com