Sanjay Gaikwad : वन गुन्ह्यावरील कारवाईचा निर्णय दाताबाबतच्या अहवालनानंतरच!

Tiger Hunting : संजय गायकवाडांचे करायला गेले काय अन् उलटे झाले पाय
Sanjay Gaikwad in Tiger Hunting
Sanjay Gaikwad in Tiger HuntingSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वाघाच्या शिकारी संदर्भात केलेले विधान त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबात उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी याला दुजोरा दिला आहे. असे असले तरी या गुन्ह्याची अंमलबजावणी तपासणीसाठी पाठविलेल्या वाघ सदृश्य दाताच्या अहवालावर अवलंबून आहे, असे त्या म्हणाल्या.

बुलढाणा शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांपैकी गजानन शास्त्री यांनी संजय गायकवाड यांच्या गळ्यात वाघाचा दात असल्याचे वक्तव्य केले होते. आमदार गायकवाड शिवरायांच्या मावळ्याचा पहेराव करून आणि हाती तलवार घेऊन कार्यक्रमस्थळी आले. डोक्यावर फेटा, गळ्यात मोत्यांच्या माळा, हातात तलवार असा त्यांचा पहेराव होता. यावेळी गायकवाड यांनी त्यांच्या गळ्यातील लॉकेटबाबत विचारले असता त्यांनी दावा केला की त्यात वाघाचा दात आहे. त्यांनी 37 वर्षांपूर्वी एका वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात घातला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Gaikwad in Tiger Hunting
MLA Sanjay Gaikwad यांच्या गळ्यातील वाघाचा दात आला त्यांच्याच गळ्याशी; गुन्हा दाखल

गायकवाड पुढे म्हणाले, ‘1987 मध्ये मी एका वाघाची शिकार केली होती आणि त्याचा दात काढून गळ्यात घातला.’ त्यावर गायकवाड यांना विचारण्यात आले की वाघ होता की बिबट्या? त्यावर गायकवाड म्हणाले, वाघाची शिकार केली होती. बिबट्या वैगरेंना तर मी असेच पळवून लावत होतो. या वक्तव्यांची दखल थेट वनविभागाने घेतली. यामध्ये नुकतेच वन विभागाच्या पथकाने गायकवाडांचे बयाणसुद्धा नोंदविले आहे. याशिवाय आमदार संजय गायकवाडांच्या गळ्यातील ती वाघाची दातसदृश्य वस्तूसुद्धा वन विभागाचे पथकाने जप्त केली आहे.

वन विभागाच्या या कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र गायकवाडांनी फक्त वक्तव्यच केले की, खरोखरच शिकार केली हे सिद्ध करण्यासाठी जप्त करण्यात आलेला दात हा वाघाचा असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी वन विभागाला चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.

वन्यजीव गुन्हा व त्यातील शिक्षा?

वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 लागू झाल्यानंतर वाघांची शिकार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 मध्ये वाघांना आययूसीएनच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या लाल यादीत संकटग्रस्त म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. हा कायदा वाघांची शिकार, वाघाची कातडी, हाडे आणि शरीराच्या अवयवांच्या तस्करीपासून संरक्षण प्रदान करतो. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दाताचा अहवाल जर पॉझिटिव्ह आला आणि यामध्ये दोष सिद्ध झाल्यास तीन ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. दोषी आढळल्यास किमान सात वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपासून 50 लाख रुपयांपर्यंत दंड त्यांना होऊ शकतो.

Edited By : Prasannaa Jakate

Sanjay Gaikwad in Tiger Hunting
Shiv Sena : संजूभाऊ अहो जरा तर दमाने घ्या... काहीही पुड्या सोडत जाऊ नका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com