
Chandrakant Bavankule: नागपूरमधील खामला येथील सहदुय्यम उपनिबंधक वर्ग २ कार्यालयात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यामुळं महसूल विभागानं अ. तु. कपले यांना प्राथमिक चौकशीअंती निलंबित करण्यात आलं आहे. यासंदर्भात शासन निर्णय महसूल विभागानं जारी केला आहे. बावनकुळे यांनी या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानं त्याला थेट घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
नागरिकांच्या सुविधांना अधिकाधिक प्राधान्य देऊन शासकीय सेवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिकांकडून नोंदणीसाठी दलालांच्या माध्यमातून रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी विभागाकडं आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन काही दिवसांपूर्वी खामला भागातील सहदुय्यम उपनिबंधक वर्ग २ कार्यालयावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापा टाकून पाहणी केली होती. या पाहणीत उपनिबंधक कपले यांच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये पाच हजार रोख रक्कम आढळून आली होती.
याबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांना योग्य तपास करण्याचे निर्देश दिले होते. प्राथमिक चौकशीनंतर कपले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा नियमांचा भंग केला असे निदर्शनास आले. त्या आधारे महसूल विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. पुढील आदेश येईपर्यंत कपले निलंबित राहणार आहेत. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय सहजिल्हा निबंधक वर्ग २, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक कार्यालय, अमरावती विभाग इथं राहणार आहे.
तसंच कपले यांना परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी कुणी लाच वा इतर कशाची मागणी केल्यास त्याची थेट तक्रार करण्याचं आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.