चार-चार कोलांटउड्या मारल्यानंतर, डॉ. महेंद्र लोढा अखेर कॉंग्रेसमध्ये स्थिरावणार ?

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचीही माहिती आहे. पण कॉंग्रेसमध्येही (Congress) ते किती काळ टिकतील, यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
Mahendra Lodha News
Mahendra Lodha NewsSarkarnama
Published on
Updated on

नागपूर ः साधारणतः १५-१६ वर्षांपूर्वी महेंद्र लोढा नावाचे एक डॉक्टर यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या वणी शहरात आले. पेशाने डॉक्टर असले तरी त्यांना राजकारणात भारी रस. त्यामुळे विविध राजकीय पक्षांमध्ये जाऊन त्यांनी आपले नशीब अजमावले. पण कुठेच डाळ शिजली नाही, म्हणून आज ते कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार आहेत. वणीचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा योग जुळवून आणला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचीही माहिती आहे. पण कॉंग्रेसमध्येही ते किती काळ टिकतील, यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. (Mahendra Lodha News)

डॉ. लोढा येथे आल्यानंतर ते वणी नजीकच्या राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाले. त्यावेळी वणी येथे वास्तव्यास असताना काही राजकीय पुढाऱ्यांशी सलगी साधत त्यांनी तेथून आपली वर्णी वणी ग्रामीण रुग्णालयावर लावून घेतली. तेथे सेवा देत असताना वणीकरांची आणखी जास्त ‘सेवा’ करण्यासाठी त्यांनी स्वतःचे रुग्णालयदेखील थाटले. दरम्यानच्या काळात राजकारणात त्यांनी समाजसेवेत रुची घेतली. ते करीत असताना राजकारणात त्यांना भारी इंटरेस्ट आला. मग ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करते झाले. त्यानंतर एक-एक पक्ष करीत करीत ते आज ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

कर्मभूमीत वैद्यकीय क्षेत्रापासून सुरू झालेली त्यांची घोडदौड समाजकारणातून राजकारणात स्थिरावली. भाजपच्या वतीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावी म्हणून केलेले प्रयत्न विफल ठरले, त्यावेळी स्वीकृत सदस्यत्वावर समाधान मानावे लागले.मात्र यादरम्यान राजकीय इच्छाशक्ती जागी झाल्याने भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी जन्मभूमीतील जुन्या सवंगड्याची मदत घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत मजल मारली. आणि आता वणी विधानसभेची उमेदवारी पदरात पाडून घेण्याची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे़. सुरुवातीला नागपुरात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्याशी सलगी साधली आणि बऱ्यापैकी आपले नाव मोठे करून घेतले. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश घेतला, तेथे जाऊन स्वीकृत नगरसेवक बनले. पण भाजपमध्ये त्यांचे मन रमले नाही की काय म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. पुढे जाऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा नेतृत्वासोबत त्यांचे पटले नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडली आणि वंचितांसाठी लढण्याचा पुळका त्यांना आला. थेट वंचितकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. पण आमदारकीची माळ काही त्यांच्या गळ्यात पडली नाही आणि त्यांना ‘वंचित’ राहिल्यासारखे वाटू लागले. पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली, ते आजतागायत राष्ट्रवादीतच होते.

Mahendra Lodha News
धानोरकरांच्या वणी-वरोराच्या प्रश्‍नावर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दाखवले राज्याकडे बोट...

आता त्यांना कॉंग्रेसची विचारधारा पटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसचा हात धरण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रश्‍न असा आहे की, चार-चार मोठ्या पक्षांमध्ये ज्यांची डाळ शिजली नाही. तेव्हा कॉंग्रेससारख्या महासागरात त्यांचे काय होणार? कॉंग्रेस त्यांना कदाचित येत्या विधानसभेची तिकीट तर देणार असेल, म्हणून ते कॉंग्रेसमध्ये जात आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांना राजकारणाची खरंच आवड आहे की, व्यवसाय वृद्धीसाठी ते सुरूवातीपासूनच राजकीय पक्षांशी सलगी साधून आहे, अशीही एक चर्चा आहे. तसे पाहिले तर डॉक्टर परळी वैजनाथ भागातले. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचे चांगले आहे. त्यांच्याच माध्यमातून त्यांनी राष्‍ट्रवादी जवळ केली होती. नागपुरातील मोठ्ठ्या हॉटेलात त्यांनी एक कार्यकर्ता मेळावाही घेतला होता. वणीतील त्यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनाला मुंडे येणार होते, असे तेव्हा त्यांनी सांगितले होते. पण ते न आल्यामुळे उद्घाटनाचा सोहळा तेव्हा रद्दही झाला होता. पण विधानसभा लढून आमदार बनण्याची जिद्द त्यांनी मनी बाळगली होती. तसे काही चिन्ह दिसत नसल्याने त्यांनी पुन्हा मार्ग बदलविला. आता कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून ते आपल्या राजकीय कारकिर्दीचा नवा अध्याय सुरू करायला निघाले आहेत.

हा मेगाप्रवेश की खोगीर भरती?

आज डॉ. महेंद्र लोढा यांच्यासोबत हज्जारो लोक कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. पण अल्पावधीतच चार-चार पक्ष सोडून आलेले डॉक्टर आणि त्यांच्यासोबत येणार लोक कॉंग्रेसशी किती प्रामाणिक राहतील आणि कॉंग्रेसमध्येच किती काळ राहतील, हा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम हा मेगाप्रवेश की खोगीरभरती, असाही प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

पोस्टर फाडून नेले..

आजच्या सोहळ्याचे जे पोस्टर शहरात लागले आहे. त्यामध्ये खाली असलेल्या फोटोंपैकी एक फोटो कुणीतरी फाडून नेला आहे. तेथे नावे कुणाचीही नाहीत. जो फोटो फाडून नेला, त्या व्यक्तीची कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा नसल्याने त्यानेच तो फोटो फाडून नेला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com