महाराष्ट्र-कर्नाटकनंतर आता नवा सीमावाद ; बुलडाण्यातील चार गावांनी केली मध्यप्रदेशात जाण्याची मागणी

जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा आणि परिसरातील इतर तीन गावांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत.
Maharashtra- Madhya pradesh  Border
Maharashtra- Madhya pradesh Border
Published on
Updated on

Maharashtra Buldhana News : राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर आता मध्यप्रदेश सीमावाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांगली, नांदेड येथील सीमाभागातील गावांनंतर आता महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुलढाणा जिल्ह्यातील चार गावांतील नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या मिळत नसल्याने मध्यप्रदेश जाण्याचा निर्णय घेतला आहे. गावात मुलभूत सुविधा मिळत नसल्याने गावकऱ्यांनी संतप्त होऊन हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवरील भिंगारा 40 टपरी गोमाल एक आणि गोमाल दोन अशा चार गावातील नागरिकांनी मध्यप्रदेशात जाण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि जळगाव जामोद तालुका प्रशासन त्यांच्या गावांना मुलभूत सुविधा पुरवण्यास असमर्थ असल्यानं सीमाभागातील या गावांना मध्य प्रदेशात सामील करून देण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. गावकऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर चारही गावातील नागरिकांनी राज्य सरकार आणि बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

Maharashtra- Madhya pradesh  Border
Vasant More : वसंत मोरेंबाबत मनसे अॅक्शन मोडवर; दोन दिवसात घेणार निर्णय...

जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा आणि परिसरातील इतर तीन गावांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. या भागांत प्रवासासाठी जळगाव जामोद ते बुऱ्हानपूर मार्गावरील भिंगारा फाट्यावरून जावं लागतं. पण हा मार्ग जंगली भागांतून जात असल्याने कोणतेही चारचाकी वाहनेही जात नाही. त्यातच रस्तेही अतिशय खराब जर कोणी आजारी पडलं तर त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रसुतीसाठी महिलांना खांद्यावर उचलून मुख्य रस्त्यापर्यंत आणावं लागतं. या भागांतील तालुका प्रशासन आणि उपविभागीय अधिकारी वर्ष-दोन वर्ष गावांत फिरकतही नसल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com