नवाब मलिकांनंतर आता 'या' मंत्र्याचा १२०० कोटींचा घोटाळा बाहेर काढणार- रवी राणा

दिल्लीतून नागपूरमध्ये आल्यानंतर रवी राणा यांनी विमानतळारच माध्यमांशी संवाद साधला
MLA Ravi Rana News Updates
MLA Ravi Rana News Updates
Published on
Updated on

नागपूर : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनि लॉंण्ड्रिग प्रकरणी इडीने अटक केल्यानंतर ते अद्यापदी इडीच्या कोठडीत आहे, राज्याच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडी पाहता राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच आता अमरावतीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनीही मोठा दावा केला आहे. अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांचा १२०० कोटींचा घोटाळा उघड करणार असल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार, असल्याचाही भाकितही वर्तवल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. (Latest political news Update)

आमदार राणा दिल्लीत असताना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात ट्रान्झिट बेल मिळाली. त्यानंतर आमदार रवी राणा नागपूरमध्ये आले. नागपूर विमानतळावर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा मारा केला असताना आमदार राणांनी राज्याविषयी महाविकास आघाडी सरकार आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे.

MLA Ravi Rana News Updates
सातबाऱ्यासाठी धडकणार आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा

'महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत. आता नवाब मलिक हे देखील इडीच्या कोठडीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर हे सरकार पाडावं लागेल. वेळ पडली तर राष्ट्रपती शासन लावावं लागेल. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जे मंत्री घोटाळेबाज आहेत त्यांना तुरूंगात जाव लागणार, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

मंत्री नवाब मलिक ईडी कोठडीत आहे. महाराष्ट्राचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. या सर्व घडामोडी पाहता महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे भाकीत आमदार राणा यांनी वर्तवले आहे. तर येत्या काही दिवसात अनिल परब हे ही तुरूंगात जाणार आहेत. त्यांचीही फाईल आणि चौकशी आता पुर्ण झाली असून लवकरच ED त्यांना अटक करेल, असाही दावा आमदार राणा यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com