Buldhana Protest : मेहकरमध्ये धनगर आरक्षणासाठी टॉवरवर चढत आंदोलन, ग्रामस्थांचा रास्ता रोको

Demand For Reservation : सोनाटी गावातील घटनेमुळं प्रशासकीय यंत्रणेची धावपळ
Protest for Dhangar Reservation in Mehekar
Protest for Dhangar Reservation in MehekarSarkarnama
Published on
Updated on

Dhangar Community : मराठा आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात सुरू असलेले आंदोलन अलीकडेच थोडे शांत झाले आहे. अशात धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटताना दिसत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असलेल्या सोनाटी येथे धनगर आरक्षणासाठी गुरुवारी (ता. १६) आंदोलन करण्यात आलं. गावातील गजानन बोरकर हे आरक्षणाच्या मागणीसाठी मोबाईल टॉवरवर चढले. त्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली.

आरक्षणाच्या मागणीसाठी बोरकर टॉवरवर चढताच सोनाटी मार्गावर ग्रामस्थांनी ठिय्या दिला. जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाहीत, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. (Agitation By Climbing On Mobile Tower for Dhangar Reservation in Sonati Village of Buldhana District)

सकल धनगर समाजाच्या वतीने एसटी प्रवर्गात आरक्षणासाठी हा रास्ता रोको करण्यात आला. या वेळी यशवंत सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख गजानन बोरकर टॉवरवर चढले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळं बुलडाणा जिल्हा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. महसूल विभागाचे अधिकारी व पोलिस सोनाटी गावातील आंदोलन स्थळाकडे धावले. मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश गिते, तहसीलदार नीलेश मडके, मेहकर पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजेश शिंगटे, डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला.

गुरुवारी सकाळपासूनच आंदोलन सुरू झाल्यानं रिसोड-मेहकरकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. बोरकर यांनी या वेळी आत्मदहनाचाही इशारा दिल्यानं अधिकारी सातत्याने धावपळ करीत होते. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. अधिकारी आंदोलनकर्ते बोरकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती. मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम असतानाच आता धनगर आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी विदर्भातून पडल्यानं यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यभरात सध्या धनगर आरक्षणाचा विषयही आक्रमकपणे मांडला जात आहे. कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर याच मागणीसाठी भंडाराही उधळण्यात आला होता. एका सार्वजनिक कार्यक्रमात हा प्रकार घडल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यावेळी धनगर आंदोलक व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते.

गेल्या काही दिवसांत मराठा आंदोलकांना हाताळता हाताळता शासन व प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. काही ठिकाणी हिंसक आंदोलनांमुळंही तणाव निर्माण झाला. अद्यापही हा मुद्दा तापता असताना धनगर समाजानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं शासनाची चांगलीच तारेवरची कसरत होणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Protest for Dhangar Reservation in Mehekar
Buldhana Guardian Minister : ‘अजितास्त्राने’ भात्यात परतावून लावले बुलडाण्यातील शिंदे सेनेचे ‘बाण’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com