अग्निपथ : थेट भरतीमुळे विरोधकांच्या दुकानदाऱ्या बंद होणार, म्हणून...

केवळ मोदी (Narendra Modi) सरकारच्या (Government) महत्वाकांक्षी अग्निपथ योजनेस अपशकून करण्यासाठी राजकीय विरोधक बेरोजगारीचे भांडवल करून निष्पाप तरुणांची माथी भडकवण्याचे काम करीत आहेत.
Modi Government on Agnipath Scheme
Modi Government on Agnipath SchemeSarkarnama

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : अग्निपथ योजनेमुळे देशातील राष्ट्रप्रेमी युवकांना केवळ रोजगारात नव्हे, तर देश सेवेच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. मात्र या थेट भरतीमुळे विरोधकांच्या दुकानदाऱ्या बंद होणार आहेत. त्यामुळे विरोधक धंदेवाईक दलालांशी हातमिळवणी करून देश वेठीस धरत आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी केला आहे.

राजकीय स्वार्थासाठी देश पेटवायला निघालेल्या विरोधकांना देशातील जनता चांगलीच ओळखून आहे. त्यांचीही कट-कारस्थाने यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास विनोद वाघ यांनी व्यक्त केला. देशांतर्गत दहशतवाद नक्षलवादी कारवाया आणि परकीय शक्तीने पुकारलेले छुपे युद्ध, अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी अग्निपथ योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. मात्र या योजनेस विरोध करण्यासाठी विरोधक तरुणांची माथी भडकवण्याचे काम करीत आहेत, असेही ते म्हणाले.

केवळ मोदी (Narendra Modi) सरकारच्या (Government) महत्वाकांक्षी अग्निपथ योजनेस अपशकून करण्यासाठी राजकीय विरोधक बेरोजगारीचे भांडवल करून निष्पाप तरुणांची माथी भडकवण्याचे काम करीत आहेत. देशाला वेठीस धरण्यासाठी विरोधक कोणत्या थराला जातात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे देशातील तरुणांनी विरोधकांच्या चिथावणीला बळी न पडता या अग्निपथ योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा उत्कर्ष साधावा आणि त्याचबरोबर या नव्या संधीचे स्वागत करून देशहितासाठी तरुणांनी अग्निपथ योजनेच्या माध्यमातून पुढे यावे, असे आवाहन विनोद भाऊ यांनी केले.

या योजनेमुळे देशातील सशस्त्र दलातील आधुनिकीकरण करणे शक्य होणार आहे. सैनिकी प्रशिक्षणाच्या महत्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून युवकांचे भारताच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण स्थान निर्माण होणार आहे. मोदी द्वेषामुळे विरोधक धंदेवाईक दलालांशी हातमिळवणी करून अग्निपथ योजनेच्या विरोधात गैरसमज निर्माण करत आहे. मात्र त्यांची कट-कारस्थाने येथील तरुण हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत वाघ म्हमाले की, चार वर्षाच्या सेवेनंतर तरुणांना अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. वीस-बावीस वर्षानंतर तरुण आपल्या करिअरकडे वळतात. मात्र तत्पूर्वी अग्निपथचा सेवा काळ समाप्त होणार आहे आणि त्यावेळी त्यांच्याजवळ किमान अकरा लाखाची पुंजी राहणार आहे.

Modi Government on Agnipath Scheme
'मराठी तरुणांनो... जरा इकडे लक्ष द्या, अग्निपथ योजनेची संधी घ्या'

अग्निवीरांना सेवाकाळात आपले औपचारिक शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे सेवासमाप्तीनंतर अग्नी वीरांना संरक्षण खात्यामध्ये प्राधान्याने नोकरी मिळणार असल्याचे देखील वाघ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विरोधक अग्निविर योजना सामाजिक सुरक्षिततेला धोका ठरेल, हा तरुणाच्या निष्ठेवर संशय घेणारा निरर्थक आक्षेप पोटदुखी झालेले विरोधक घेताना दिसत आहेत. कारण या काळात मिळणारे प्रशिक्षण हे देशप्रेमी, राष्ट्रनिष्ठेचे राहणार आहे. त्यामुळे असा आरोप करणे म्हणजे सैन्यदलाच्या निष्ठेवर संशय आणि गैरसमज पसरवणे आहे. त्यामुळे तरुणांनी या माथे भडकणाऱ्या विरोधकांच्या आमिषाला बळी न पडता अग्निपथ योजनेमध्ये सामील व्हावे, असे आवाहन वाघ यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com