Ajit Pawar Big Step : एक साहेबांचा, तर दुसरा दादांचा, अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन जिल्हाध्यक्ष !

Sunil Tatkare : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली.
Krishna Andhare, Sangram Gawande and Vijay Deshmukh
Krishna Andhare, Sangram Gawande and Vijay DeshmukhSarkarnama

Latest update from NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे अकोला जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) म्हणून कृष्णा अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली. अकोला जिल्ह्यातही अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले आहेत. (The incumbent has gone with Ajit Pawar's NCP)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. आमदार अमोल मिटकरी यांच्यासह महानगराध्यक्ष विजय देशमुख, ज्येष्ठ नेते कृष्णा अंधारे आदी पदाधिकारी हे अजितदादांसोबत आहेत. कृष्णा अंधारे हे कट्टर अजितदादा समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अकोला जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.

अकोला जिल्ह्यात ग्रामीणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन जिल्हाध्यक्ष झाले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी संग्राम गावंडे हे जिल्हाध्यक्ष होते. अजित पवार बाहेर पडल्यानंतर संग्राम गावंडे हे शरद पवार गटाकडे कायम राहिले आहेत. त्यामुळे त्यांचे जिल्हाध्यक्षपदही कायम आहे. आता अजित पवार गटाकडून कृष्णा अंधारे यांची नियुक्ती करण्यात आल्याने अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन जिल्हाध्यक्ष झाले आहेत.

अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर सुरुवातीचे दोन दिवस कार्यकर्ते चांगलेच गोंधळात होते. पण कालपासून बऱ्यापैकी कार्यकर्त्यांमधील गोंधळ कमी झाला आणि त्यांनी आपली राजकारणाची दिशा ठरवली. कुणी अजित पवाराकडे गेले, तर काही शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. कार्यकर्त्यांमधला गोंधळ दोन दिवसांत मिटला. पण पक्ष पातळीवरचा गोंधळ अधिक वाढला आहे आणि भविष्यातही वाढतच जाणार, असे दिसते.

Krishna Andhare, Sangram Gawande and Vijay Deshmukh
Ajit Pawar News : उपराजधानीत आता होणार राष्ट्रवादी ‘पॉवरफुल्ल’, `या’ नेत्याने कसली कंबर…

अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हे दोहोंवर दावा केला. त्यावर आपले चिन्ह कुठेही जाणार नाही, अशी घोषणा शरद पवारांनी केली. त्यातच आज शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त खासदार शरद पवारांसोबत असल्याने खरी राष्ट्रवादी शरद पवारांचीच, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते, तेव्हा जो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये जो गोंधळ उडाला होता, तोच गोंधळ आता राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाचा उडणार, असे एकंदरीत चित्र आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com