Ajit Pawar : दादांनी वारंवार सांगितलं, पण ऐकलं नाही; आमदार मिटकरींना आगाऊपणा नडला?

Amol Mitkari : प्रसारमाध्यमांनाच चुकीचे ठरवलं, पण खरं तर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
Ajit Pawar and Amol Mitkari
Ajit Pawar and Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्या पक्षाने मोठा दणका दिला आहे. त्यांचं मुख्य प्रवक्तापद अवघ्या सहा महिन्यांच्या आत काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करीत मला मुख्य प्रवक्ते पदावरून हटविल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचा दावा त्यांनी केला.

मुख्य प्रवक्ता ही निवड अद्याप केली नव्हती. असंही मिटकरी यांचं म्हणणं आहे. मी पक्षाचा प्रवक्ता आहे असंही ते म्हणाले. मात्र ज्या प्रसारमाध्यमांनी मिटकरी यांना मोठं करण्याचं सामर्थ्य दाखविलं, त्याच माध्यमांच्या बातम्या मिटकरी यांनी चुकीच्या ठरविल्या, हे कुणालाही पटलेलं नाही. आमदार अमोल मिटकरी यांनी केलेला दावा आणि प्रसार माध्यमांनी प्रसारित केलेल्या बातम्या, कोण चुकीचं हे जनतेला चांगलंच माहिती आहे. मात्र मिटकरींची मुख्य प्रवक्ते पदावरून केलेली उचलबांगडीची बातमी चर्चेचा विषय बनली. त्यांचं मुख्य प्रवक्ते पद का गेलं, या विषयावर आता चर्चा झडू लागल्या आहेत.

Ajit Pawar and Amol Mitkari
मी आमदार आणि प्रवक्ता आहे, 'त्या' बातम्या चुकीच्या | Amol Mitkari News

समाज माध्यमातून वेगवेगळी वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न आमदार अमोल मिटकरी यांचा असतो. अनेकवेळा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा 'दादांनी' त्यांना समजही दिली आहे. मात्र अमोल मिटकरी यांनी ते फारसं मनावर घेतलं नाही आणि आपली वक्तव्ये कायम ठेवली. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांचा गट शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करत असल्याची घोषणा केली होती. मिटकरी यांना मुख्य प्रवक्तापदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर आमदार मिटकरींनी प्रसार माध्यमांसह सोशल माध्यमातून वेगवेगळी विधान करून कायम चर्चेत राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

अमोल मिटकरी यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी पक्षाचा जोरदार प्रचार केला होता. प्रचारादरम्यान त्यांची भाषणंही प्रचंड गाजली होती. पक्षात त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी यांचं अनेकदा जाहीरपणे कौतुकही केलं होतं. अखेर त्यांना पक्षाकडून विधानपरिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली. अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून आमदार अमोल मिटकरी यांच्या कडे पाहिले जाते. आमदार झाल्यानंतर मिटकरी यांनी अनेकदा चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांचा भरपूर वापर करून घेतला.

वक्तृत्वात पटाईत असल्याने त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. मात्र अनेकदा त्यांच्या काही वक्तव्यांमुळे वादही झाले. सत्तेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी भाजपवर अनेकवेळा तोंडसुख घेतले होते. काही महिन्यांपूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आला. अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली. त्यामुळे राज्यभर ब्राह्मण समाज आक्रमक झाला होता.

राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अकोल्यात झालेल्या आढावा बैठकीत आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गंभीर आरोप झाले. शिवा मोहोड यांनी मिटकरींवर गंभीर आरोप केले होतो. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, मोहोड यांनी प्रसार माध्यमांशी बोलतानाही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोघांमधील हा वाद इतका विकोपाला गेला की,

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातील या प्रकरणाची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेतली होती. महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही आमदार मिटकरींनी चर्चेत राहण्यासाठी अनेकवेळा तशी वक्तव्यं केली आहेत. नुकतंच त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना. राऊत यांचे तीन अवयव निकामी झाल्याची टीका केली. यावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार यांनी संतप्त होत मिटकरींचा किरीट सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराच देऊन टाकला.

महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याच्या पूर्वी मिटकरींनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा आमदार मिटकरी यांना सत्तेत सहभागी झाल्यानंतर देखील विरोध कायम आहे. तर आता मिटकरींची मुख्य प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्र मिटकरींनी प्रसारमाध्यमांनाच चुकीचे ठरवलं आहे. खरं तर मिटकरी यांचं पद का गेलं, यासाठी त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com