Sharad Pawar News : पवारसाहेब मोदींसोबत येणार? अजितदादा-अमित शाहांच्या भेटीमागे लपलंय मोठं रहस्य!

Ajit Pawar Amit Shah Meeting Ravi Rana Reaction : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर आता आमदार रवी राणा यांनी गाैप्यस्फोट केला आहे....
Sharad Pawar, Ajit Pawar, Ravi Rana
Sharad Pawar, Ajit Pawar, Ravi RanaSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : अजित पवार यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर लगेचच दिल्लीत जाऊन अमित शाहा यांची भेट घेतली. यावर आमदार रवी राणा यांनी मोठं विधान करत दावाही केला आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत यावं, यासाठी अजित पवार प्रयत्न करीत आहे, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar, Ravi Rana
Ajit Pawar News : अजितदादांची अमित शाहांसोबत दीड तास चर्चा; आरक्षणाचा मुद्दा की मंत्रिमंडळ विस्तारावर खल?

अजितदादा-अमित शाहांच्या भेटीवर काय म्हणाले रवी राणा?

शरद पवारसाहेब हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. आणि राज्याचं भलं होईल या दृष्टीने शरद पवारसाहेबांनी पंतप्रधान मोदींसोबत यावं, यासाठी अजित पवार हे सातत्याने शरद पवारसाहेबांचं मन वळण्याचा प्रयत्न करत आहेत. पवारसाहेब भाजपसोबत आल्यास सरकार मजबूत होईल. आणि जनतेची कामं होऊन राज्याचा विकास होईल. कदाचित पवारसाहेबाचं मन वळण्यात अजितदादांना यश आलं असेल, असा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली असेल, तर लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडतील. शरद पवार हे पंतप्रधान मोदींसोबत येऊन सरकार मजबूत करतील. तसेच आगामी काळात काँग्रेससह अनेक नेते मोदींना पाठिंबा देतील व विरोधी पक्षात कमी लोक राहतील, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार आणि अमित शाहांच्या भेटीत अनेक रहस्य लपलेली!

अजित पवार आणि अमित शाहांच्या भेटीत अनेक रहस्य लपलेली आहेत. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजितदादांनी तातडीने अमित शाहांची भेट घेतली. मोठ्या प्रमाणात तिथे राजकीय चर्चा झाली असेल. नक्की पवार साहेब हे मोदींचं काम बघून त्यांना पाठिंबा देतील. राज्याच्या विकासासाठी लवकर पवारसाहेब मोदींसोबत येतील, असं मोठं विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com