Akola NCP
Akola NCPSarkarnama

Ajit Pawar News : अकोल्यात अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनंतर महानगराध्यक्षही ठरला !

Akola : देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दिला.
Published on

Deshmukh supported Deputy Chief Minister Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अकोला महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दिला. त्यांची बुधवारी अकोला महानगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना मुंबई येथे त्यांना नियुक्तिपत्र दिले. (Compulsorily attended the swearing-in ceremony of Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठे उलटफेर झाले. त्यात शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले. यामुळे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अकोला महानगराध्यक्ष विजय देशमुख हे मुंबईत अजित पवार यांच्या शपथविधीसाठी आवर्जून उपस्थित होते. या कारणाने शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देशमुख यांना तत्काळ बडतर्फ करण्यात येत असल्याचा आदेश काढला होता.

देशमुख हे अजित पवार यांच्या गटात सहभागी असल्याने त्यांच्याकडे अकोला शहराची जबाबदारी कायम ठेवली जाणार ही अपेक्षा होती. त्यानुसार आज (ता. १२) राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे शासकीय निवासस्थान देवगिरी येथे अकोला महानगरध्यक्षपदी विजय देशमुख नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे हस्ते देशमुख यांना देण्यात आला.

आमदार अमोल मिटकरी व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याकडे अकोला महानगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पक्ष वाढीसाठी जोमाने कार्य करण्याची ग्वाही या प्रसंगी विजय देशमुख यांनी दिली. विजय देशमुख यांच्या नियुक्तीपूर्वी कृष्णा अंधारे यांचीही अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Akola NCP
Akola District News : ‘वाण’ला विरोध करणारे आमदार पडले तोंडघशी, नितीन देशमुखांच्या 'त्या' मोर्चाला यश मिळतंय !

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) शरद पवार (Sharad Pawar) व अजित पवार, असे दोन गट पडल्यानंतर शरद पवार यांनी येवल्यात सभा घेऊन ॲक्टीव्ह मोडवर आल्याचे दाखवून दिले. तर अजित पवार गटानेही जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांच्या नियुक्‍त्यांचा धडाका लावला आहे. नागपुरात अजित पवार (Ajit Pawar) गटाचे कार्यालय सुरू झाले आणि त्यांचा एक मेळावाही पार पडला. स्पर्धेत कोणता गट पुढे निघतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com