Ajit Pawar Big Step News : कालचा भूकंप काल भाजप सत्तेसाठी किती रसातळाला जाऊ शकते, हे काल महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले. देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष दोघांनी विश्वासार्हता गमावलेली आहे. त्यांनी राज्यात कुसंस्कृती आणलेली आहे, असे काळ्या अक्षरात या घटनेबद्दल भविष्यात लिहिले जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले. (Both Devendra Fadnavis and Bharatiya Janata Party have lost credibility)
आज (ता. ३) सकाळी नागपूर विमानतळावर साम टीव्हीशी बोलताना लोंढे म्हणाले, कालच्या बंडानंतर महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला तडे गेल्याचे काही लोक बोलत आहेत. पण ते साफ खोटं आहे, उलट या घटनेनंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ अधिक घट्ट झाली आहे. नेते गेले म्हणून जनता गेली, असं होत नाही. आज महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता आहे.
भाजपच्या कार्यशैलीवरून जनतेमध्ये घोर निराशा बघायला मिळत आहे. भाजपचे पंतप्रधान, जे की आता फक्त झेंडा मंत्री आहे. कारण ते आता झेंडा दाखवण्यापुरतेच समोर येतात. ते २७ तारखेला सांगतात की, सर्वात भ्रष्टाचारी पक्ष हा राष्ट्रवादी कॉग्रेस आहे. ७० हजार कोटीचा सिंचन घोटाळा, २५ हजार कोटीचा राज्य सहकारी बॅंकेचा घोटाळा आणि काय काय त्यांनी सांगितले.
केवळ येवढे सांगून नरेंद्र मोदी थांबले नाहीत, तर त्यांनी लोकांना ग्वाही दिली की, आम्ही त्यांना शिक्षा देऊ. पण त्यांची ही ग्वाही उलटी झाली. सर्व भ्रष्टाचारी लोक जे आहेत, ते आमच्याकडे येतील, असेच त्यांना तेव्हा सांगायचे असेल, असे लोंढे म्हणाले. महाविकास आघाडीत छोटा भाऊ, मोठा भाऊ असं काही नाही. सत्तेची लढाई महत्वाची नाही.
ज्या पद्धतीने लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. ज्या पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर करून राजकारण गलिच्छ केले जात आहे. संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई आहे. यामध्ये तिन्ही पक्ष घट्ट पाय रोवून उभे आहेत, असे अतुल लोंढे यांनी सांगितले.
२०१४ पासून ते आतापर्यंत जे खेळ यांनी केले, ते लवकरात इतिहासजमा होणार आहेत आणि एक विषय तर अजून आहेच की, ‘तुम्हारा क्या होगा शिंदे’, (Eknath Shinde) असे म्हणत लोंढेंनी कालच्या घडामोडीची खिल्ली उडवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र यावे किंवा नाही हा सर्वस्वी त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, असे लोंढे म्हणाले.
उद्या (ता. ४) कॉंग्रेसची (Congress) महत्वाची बैठक आहे. यामध्ये आमचे नेते जनतेला विश्वास देणार आहेत की, या घाणेरड्या राजकीय परिस्थितीत आम्ही त्यांना दिलासा देणार आहोत. कारण काही भांडवलदार एकत्र येऊन हा पक्ष तयार झालेला नाही, तर पक्षाला त्यागाचा, बलिदानाचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे उद्या जनता कॉंग्रेससोबत येणार, असा विश्वास अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी व्यक्त केला.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.