Ajit Pawar News : काहींना लगेच राग येतो, त्यामुळं ज्याचं त्याला लखलाभ…

Sanjay Raut : खासदार राऊत यांनी अजितदादांवर पलटवार केला होता.
Ajit Pawar and Sanjay Raut
Ajit Pawar and Sanjay RautSarkarnama

Ajit Pawar on Sanjay Raut at Nagpur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत थुंकले होते. त्यावरून प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्येक नेत्याने बोलताना तारतम्य बाळगावे, असा सल्ला दिला होता. त्यावर खासदार राऊत यांनी ‘धरणात XXXपेक्षा थुंकणं चांगलं’ असे म्हणत अजितदादांवर पलटवार केला होता. (Ajit Pawar has come to Nagpur for a two-day OBC camp of NCP)

अजित पवार आज (ता. ३) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन दिवसीय ओबीसी शिबिरासाठी नागपुरात आलेले आहेत. सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी खासदार राऊतांच्या वक्तव्यावर उपरोक्त प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर ते वरोरा येथे कॉंग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट देण्यासाठी गेले होते. तेथून नागपुरात परतल्यावर त्यांनी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला.

संजय राऊत यांची जीभ वारंवार घसरतेय. त्यामुळे महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांची वेगवेगळी वक्तव्य असतात. पण जोपर्यंत तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकोपा आहे, तोपर्यंत असं काहीही होणार नाही आणि कुणी काय वक्तव्य करायचं, हा त्यांचा त्यांचा अधिकार आहे. मी कुणाला काही सांगितलं की, त्याचा काहींना वाईट वाटतं, राग येतो. त्यामुळे ज्याचं त्याला लखलाभ.

अजित पवारांचे दोन्ही कार्यक्रम आज पूर्व नागपुरातच आयोजित करण्यात आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे पूर्व नागपुरातून काही वेगळे नियोजन आहे का, असे विचारले असता, पूर्व नागपूर आणि पश्‍चिम नागपूर असा विचार येथे आल्यावर कधीच करत नाही. येथे सहा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे संपूर्ण शहर डोळ्यांसमोर ठेऊनच आम्ही विचार करतो. त्यामुळे कुणीही असा विचार करू नये, असे पवार म्हणाले.

मुधोजी राजे भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यावेळी मी अनिल देशमुख, बाबा गुजर आणि दुनेश्‍वर पेठे यांना सांगितले की, त १० वाजताचा कार्यक्रम झाल्यानंतर पक्षाचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर घ्या. तेसुद्धा उद्या शहराच्या एखाद्या भागात कार्यक्रम घेतील. त्यामुळे केवळ त्याच भागावर आम्ही लक्ष देतोय, असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे नागपुरात (Nagpur) असताना संपूर्ण नागपूर शहराचाच आम्ही विचार करतो, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com