Ajit Pawar News : बच्चू कडूंसह आमदारांची चिंता व्यर्थ तर नाही, कदाचित यावेळी...

NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना त्यांनी झुकते माप दिले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar embezzled funds : महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी निधीची पळवापळवी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना त्यांनी झुकते माप दिले, असे आरोप करीत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अजित पवार अर्थमंत्री पदावर नकोच, अशी भूमिका घेतली. (Ajit Pawar has joined the government with a large number of MLAs)

आज (ता. १२) सकाळी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना आमदार कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी शिंदे गटातील रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनीही अजित पवारांना अर्थमंत्री पद देण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार आमदारांचे मोठे संख्याबळ घेऊन सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे त्यांना महत्वाचे मंत्रिपद दिले जाईल, हे निश्‍चित आहे.

अशा वेळी शिंदे गटातील आमदारांचा अजित दादांनी विरोध व्यर्थ तर नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. अजित पवारांनी बंडखोरी केली, त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मुंबईत झालेल्या पहिल्याच बैठकीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. ‘प्रत्येक वेळी मला पुढं करून, कसं फसवलं जात होतं, कसं बदनाम केलं जात होतं’, हे त्यांनी सांगितलं. पहाटेचा शपथविधीही त्यातलाच एक प्रकार होता, असंही नेत्यांनी त्यावेळी सांगितलं.

‘महाराष्ट्राशी खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही’, असं म्हणत दादांनी घडलेल्या खऱ्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळे शक्यता आहे की, निधीची पळवापळवी करण्याबाबतही तेव्हा अजित पवारांवर दबाव असेल. शिर्षस्थ नेत्यांच्या सांगण्यावरून तेव्हा त्यांना तसं वागावं लागलं असेल... कारण अजित पवार म्हणजे स्पष्ट वक्ता अन् दिलदार नेता, अशी ख्याती त्यांची आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांनी दादां(च्या अर्थमंत्रिपदाला विरोध करण्याचे काही एक कारण नाही, असाही एक मतप्रवाह आहे.

Ajit Pawar
#Shorts | मुख्यमंत्री 'असं काही' बोलले की अजितदादाही हसले | Eknath Shinde | Ajit Pawar | Sarkarnama

आता अर्थमंत्रिपदी विराजमान झाल्यावर अजित पवारांवर (Ajit Pawar) ‘तसा’ दबाव नसणार आहे. कारण ते स्वतंत्रपणे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे यावेळी कदाचित ते सर्वांसोबत समान न्याय करण्याचा प्रयत्न करतील, असेही पवार समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांनी (MLA) सत्तेत सहभागी असताना अजित पवारांना विरोध करू नये, असेही काहींचे मत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com