Ajit Pawar : खुशखबर!!! अजितदादांचे ज्येष्ठ सेवानिवृत्तांना मोठे ‘गिफ्ट’; जानेवारी 2024 पासून...

Pension Scheme : राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; जानेवारीपासून रकमेत वाढ
Ajit Pawar on Pension Scheme
Ajit Pawar on Pension SchemeSarkarnama

Maharashtra Government : राज्य सरकारच्या वित्त विभागाने आज 80 ते 100 वर्षे वय असलेल्या राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारकांसाठी ‘गुड न्यूज’ दिली आहे. ही ‘गुड न्यूज’ 80 वर्षे वयापेक्षा अधिक वय असलेल्या सर्व निवृत्तिवेतनधारकांसाठी आहे. निवृत्तीनंतर ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वय 100 वर्षे आणि त्यावर असेल त्यांच्या मूळ निवृत्तिवेतनात 100 टक्के वाढ जानेवारी 2024 पासून होणार आहे.

राज्य सरकारने ज्येष्ठ निवृत्तिवेतनधारकांना खुश करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर भार जरी पडत असला, तरी सेवानिवृत्त ज्येष्ठ शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. यामुळे वृद्धापकाळातील आजार आणि आर्थिक समस्यांपासून अशा ज्येष्ठ सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांना मुक्ती मिळेल. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेत अशांना मोठा दिलासा दिला आहे.

Ajit Pawar on Pension Scheme
Ncp Mla Disqualification : अजित पवार गटाच्या आमदारांचा 'मेरा जवाब'

80 वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन तसेच कुटुंब निवृत्तिवेतनात 1 जानेवारी 2024 पासून मोठी वाढ करण्यात आली आहे. 80 वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तिवेतन, कुटुंब निवृत्तिवेतनात वाढ 1 जानेवारी 2019 पासून सुधारित करण्यात आली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे आता वय वर्षे 80 ते 85 मूळ निवृत्तिवेतनात 20 टक्के वाढ देण्यात येईल. वय वर्षे 85 पेक्षा अधिक ते 90 वयोगटातील निवृत्तिवेतनधारकांसाठी मूळ निवृत्तिवेतनात 30 टक्के वाढ असेल. वय वर्षे 90 पेक्षा अधिक ते 95 या वयोगटातील निवृत्तिवेतनधारकांसाठी मूळ निवृत्तिवेतनात 40 टक्के वाढ करण्यात आली आहे. वय वर्षे 95 पेक्षा अधिक ते 100 वर्षे वयोगटातील ज्येष्ठांसाठी मूळ निवृत्तिवेतनात 50 टक्के वाढ करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकार इतक्यावरच थांबलेले नाही, तर ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी वयाचे शतक पार केले आहे, अशा वय वर्षे 100 पेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मूळ निवृत्तिवेतनात 100 टक्के वाढीची मोठी घोषणा राज्याच्या अर्थ खात्याने केली आहे. कर्मचाऱ्यांना हे लाभ 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील. त्यापूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तिवेतन घेत असलेल्या निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम मिळणार नाही.

शासनाने असाही आदेश दिला की, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे, यामधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्षे व त्यापुढील निवृत्तिवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना हा निर्णय लागू असेल. हा निर्णय जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्षे व त्यापुढील निवृत्तिवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहणार आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Ajit Pawar on Pension Scheme
Thane Politics : कल्याणचे खासदार ठाण्यात 'क्लीन बोल्ड' अजित पवार गटाच्या नेत्याने विकेट तर काढलीच, शिवाय...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com