Ajit Pawar's Bungalow News : अजित पवारांच्या बंगल्याचा अजूनही निर्णय नाही, प्रस्ताव नागपुरातच पडून !
Nagpur Political News : उपराजधानी नागपुरात मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी हा बंगला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. पण नागपुरात त्यांच्यासाठी बंगला नाही. त्यामुळे जागेचा शोध घेऊन स्वतंत्र बंगला तयार करण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केला. पण तो प्रस्ताव अजूनही मुंबईला गेला नसल्याची माहिती आहे. (It is reported that the proposal has not yet gone to Mumbai)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ‘देवगिरी’प्रमाणे स्वतंत्र बंगला तयार करायचा आहे. यासाठी दोन जागांचा शोधही घेण्यात आला. पण हा विषय थंडबस्त्यात गेल्याने जागेवर अंतिम मोहर लागू शकली नसल्याची चर्चा आहे. राज्यातील राजकारणात कधी काय होईल, याचा अंदाज सामान्य नागरिकांना बांधणे अवघड झाले आहे.
भाजप व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या सत्तेवर हल्लाबोल करणारे राष्ट्रवादीचे नेतेच अजित पवार त्यांच्यासोबत गेले. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतील काही आमदार सत्तेत सामील झाले. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले. त्यामुळे राज्यात दोन उपमुख्यमंत्री झालेत.
नागपुरात मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी हे शासकीय निवासस्थान आहे. तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी बंगला आहे. हा बंगला देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांसाठी एकच शासकीय निवासस्थान आहे. दोन उपमुख्यमंत्री झाल्याने प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी त्यांच्यासाठी रविभवन येथील एका कॉटेजमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. परंतु यावर ते असमाधानी असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री पवार यांना स्वतंत्र बंगला नसल्याचे वृत्त ‘सरकारनामा’मध्ये प्रकाशित झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेची शोध मोहीम सुरू केली होती.
सहपोलिस आयुक्त (Commissioner) व मेट्रो भवनाचा बंगला दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी राखीव करण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केला. जागा अंतिम करण्यासाठी अहवाल बांधकाम मंत्रालय (Mantralaya) व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात येणार होता. परंतु अद्याप तो पाठवण्यात आला नसल्याची माहिती आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.