MLA Chandrikapure News : अजित पवारांचे कट्टर समर्थक आमदार चंद्रिकापूरे मेळाव्याला गैरहजर, उलटसुलट चर्चांना फुटले पेव !

Gondia : चंद्रिकापूरे यांच्या अनुपस्थितीची चर्चा होण्यामागे कारणही ठोस आहे.
Manohar Chandrikapure
Manohar ChandrikapureSarkarnama
Published on
Updated on

Gondia-Bhandara Political News : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात अजित पवार गटाचे ते एकमेव आमदार आहेत आणि प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात आयोजित केलेल्या मेळाव्याला चंद्रिकापूरे गैरहजर होते. त्यामुळे उलट-सुलट चर्चांना पेव फुटले आहे. (Sugat Chandrikapure joined Eknath Shinde's Shiv Sena)

चंद्रिकापूरे यांच्या अनुपस्थितीची चर्चा होण्यामागे कारणही ठोस आहे. त्यांचे चिरंजीव सुगत चंद्रिकापूरे यांनी काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आमदार चंद्रिकापूरेसुद्धा शिंदे गटाच्या वाटेवर तर नाहीत ना, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. गोंदियात काल (ता. २४) खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन काल करण्यात आले होते. परवा (ता. २३) भंडारा येथील कार्यकर्ता मेळाव्यातील आमदार चंद्रिकापूरे यांची उपस्थिती अनेकांना खटकली.

मनोहर चंद्रिकापूरे प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. या नाराजीमुळेच त्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नाराजीमुळे ते शरद पवार गटात जाण्याचीही शक्यता काहींनी बोलून दाखवली. आता चंद्रिकापूरे नेमके शिंदे गटात जाणार, शरद पवार गटात जाणार की नाराजी मिटवून अजित पवारांसोबत राहणार, हे येणारा काळच सांगणार आहे.

यासंदर्भात आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्याशी संपर्क केला असता, ‘मी सध्या विदेशात आहे, पुढील महिन्यात तीन किंवा चार तारखेला आल्यानंतर बोलू’, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चांमध्ये काही दम नाही, असेही काहींचे मत आहे. एकुणच राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्या सद्यःस्थितीबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेट झाल्यामुळे हा संभ्रम अधिकच वाढला.

Manohar Chandrikapure
Gondia Dhan Scams : धान घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुंबईचे पथक गोंदियात दाखल !

अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) लवकरच एकत्र येतील, अशी आशा काही पदाधिकाऱ्यांना आहे. काहींनी तर या एकत्रीकरणाचा मुहूर्तही काढलेला आहे. असे असले तरी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची (NCP) दिशा काय असेल, हे सध्यातरी कुणी सांगू शकत नाही.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com