Bhandara-Gondia Paddy Scams : गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामात धान खरेदीत शासकीय धान खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याची माहिती समोर आली होती. खरेदी केंद्रांची चौकशी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनच्या मुंबई आणि पुणे कार्यालयांतील सहा अधिकारी गोंदियात दाखल झाले आहेत. (Six officers from Mumbai and Pune offices have entered Gondia)
हे अधिकारी धान खरेदी केंद्रांना भेटी देऊन चौकशी करणार आहेत. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची एजन्सी म्हणून धान खरेदी करणाऱ्या सेवा सहकारी संस्था हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करतात. मात्र खरीप व रब्बी हंगामात सहा संस्थांनी खरेदी केलेला धान फेडरेशनकडे जमा केलाच नाही. तर राईस मिलर्सलासुद्धा धानाची उचल दिली नाही.
काही संस्थांनी धानाच्या तुटीची रक्कम भरून दिली नाही. त्यामुळे या केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे थकले आणि शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या सर्व प्रक्रियेची हे सहा अधिकारी चौकशी करणार असून याचा अहवाल समोर आल्यावर दोषी धान्य खरेदी केंद्रावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेल्या धानाची योग्य किंमत मिळावी म्हणून शासनाची अभिनव अशी धान खरेदी केन्द्राच्या योजनेची सुरुवात झाली. मात्र हिच अभिनव कल्पना मोठ मोठाले घोटाळ्यांचे केंद्र ठरली. झटपट तीन महिन्यांच्या कालावधीत कोट्यवधी रुपये आर्थिक व्यवहार होत असल्याने व्यापाऱ्यांची नजर धान खरेदी केंद्रांवर पडली.
मूठभर व्यापाऱ्यांनी याला व्यवसाय बनवत आपले आर्थिक इस्पीत साध्य करण्यास सुरुवात केली. यात अधिकाऱ्यांचा समावेश झाल्याशिवाय घोटाळा होणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचाही सहभाग यात करण्यात आला आणि दरवर्षी शासनाला (State Government) कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यास सुरुवात झाली. करदात्यांच्या पैशांचा असा अपहार सुरू झाला होता.
अधिकारी सहभागी असल्याशिवाय कोणताही घोटाळा होऊ शकत नाही. यापूर्वी ही बाब अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईतून स्पष्ट झाली आहे. आता मुंबईचे (Munbai) पथक गोंदिया (Gondia) जिल्ह्यात झालेल्या धान घोटाळ्याची चौकशी करणार आहेत. यामध्ये आणखी काय घबाड उघडकीस येते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.