Amol Mitkari Vs MNS: अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या दोन मनसैनिकांना अटक; 10 आरोपी फरार

NCP MLA Amol Mitkari Car Dies News Update: तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक केली आहे. साबळे हे मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत.त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Amol Mitkari Car
Amol Mitkari CarSarkarnama
Published on
Updated on

Akola News:राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मंगळवारी तोडफोड करण्यात आली, याप्रकरणी दोन मनसैनिकांना अकोला पोलिसांनी अटक केली आहे. मिटकरी यांच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक केली आहे. साबळे हे मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत. अटकेची कारवाई केल्यानंतर दोघांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्य सुत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे हे अद्याप फरारच अहेत. दुनबळे यांनीच मनसैनिकांना मिटकरींवर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात एकूण 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुनबळे यांच्यासह 10 आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Amol Mitkari Car
Nitin Gadkari: गडकरीसाहेबांच्या विकासाच्या 'व्हिजन'ला दृष्ट लावताहेत हे खड्डे

मिटकरींनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणत डिवचलं होते. त्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. मनसैनिकांनी अकोल्यात मिटकरी यांची गाडीची तोडफोट केली. त्यानंतर झालेल्या राड्यामध्ये मनसे पदाधिकारी जय मालोकार हेदेखील सहभागी होते. घटनेनंतर मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com