Akola District News : अजित पवारांनी मागवली अकोल्यातील २५ कोटींच्या कामांची यादी!

Ajit Pawar : अकोल्यासाठी २५ कोटी रुपये देण्याबाबत सांगितले होते.
Ajit Pawar
Ajit Pawar
Published on
Updated on

Akola was a wasteland for local NCP leaders : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका महाराष्ट्राला ठाऊक आहे. आता त्यांच्याकडे अर्थ खाते आले आहे. पण त्यापूर्वीच त्यांनी अकोल्यासाठी २५ कोटी रुपये देण्याबाबत सांगितले होते. तशी यादीही त्यांनी मागवली होती, असे अजित पवार गटाचे अकोला शहराध्यक्ष विजय देशमुख म्हणाले. (There is a chance to breathe freely)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसाठी अकोला ही पडीक जमिनी होती. आतापर्यंत मुस्कटदाबी केली जात होती. मात्र, अजित पवार यांनी शहराध्यक्षपदी नव्याने नियुक्ती केल्याने मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा हा पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच विकासाची मोट बांधण्यासाठी करू, असे विजय देशमुख म्हणाले.

अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नितीन झापर्डे, मनोज गायकवाड, बुढण गाडेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. येत्या काळात संघटनात्मक बांधणीवर भर देऊन पक्षाची मोट बांधणार आहे. जुन्या नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या खांद्यावर नव्याने धुरा देण्यात येणार आहे, असे देशमुख म्हणाले.

येत्या आठवड्याभरात सामाजिक समीकरण, पक्षाविषयी तळमळ, नियोजन आणि पक्षाची ध्येय धोरणे पाहून नियुक्त्या करणार असल्याचेही यांनी सांगितले. आमदार अमोल मिटकरी पक्षाचे प्रदेश प्रवक्ता झाल्याने पक्षाला बळ मिळाले आहे. ध्येय धोरणे राज्यभर पोहोचवण्यासाठी आमदार मिटकरींसारखेच प्रवक्ते पक्षाला हवे होते. जिल्ह्यात राष्ट्रवादी नव्या दमाने वाढवणार असल्याचेही देशमुख यावेळी म्हणाले.

Ajit Pawar
Akola News : बळजबरीने केले मुलाचे धर्मांतर, पहाटे पावणे तीन वाजता घेतली आईची तक्रार, अकोल्यात खळबळ !

सर्वांना निर्णयाचे स्वातंत्र्य..

पक्षाची धेय्य धोरण राबविण्यासाठी व पक्ष संघटना वाढविण्यासाठी सर्वच घटकांना सोबत घेणार आहे. सोबत येण्यासाठी कुणावरही दबाव नाही. सर्वांना निर्णयाचे स्वातंत्र्य आहे. ज्यांना सोबत यायचे त्यांना सोबत घेऊन नव्याने आखणी करणार असल्याचेही विजय देशमुख यांनी सांगितले.

वित्त मंत्रालय अन् अकोल्यासाठी निधी..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वाट्याला वित्त मंत्रालय आले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे हे खाते येण्यापूर्वीच त्यांनी अकोल्यासाठी (Akola) २५ कोटीचा निधी देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यासंदर्भातील कामांची यादीही त्यांनी मागविली आहे. ही कामे मंजूर करून विकासाला अधिक गती मिळणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com